
लोकसभा निवडणुकीत मुस्लिम बहुल मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. त्यानंतर व्होट जिहादचा मुद्दा ऐरणीवर आला. मात्र आता मुस्लिमबहुल मतदारसंघातच महायुतीला मोठं यश मिळालं आहे. ते नेमकं कसं? मुस्लिम समाज महायुतीच्या पाठीशी उभा राहिला आहे का?
लोकसभेला फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपने व्होट जिहाद विरुद्ध मतांचं धर्मयुद्ध असा नारा दिला होता. मात्र भाजपने केलेल्या धार्मिक धृवीकरणाच्या आवाहनानंतरही मुस्लिमबहुल भागाने महायुतीला कौल दिल्याचं चित्र आहे. राज्यातील 38 पैकी 21 जागांवर महायुती तर 16 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळालं. मुस्लिमबहुल मतदारसंघात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत?
मुस्लिमबहुल मतदारसंघांचा कौल कुणाला?
भाजप- 14
शिंदे गट- 05
राष्ट्रवादी (AP)- 02
काँग्रेस- 05
ठाकरे गट- 06
राष्ट्रवादी (SP)- 03
समाजवादी पक्ष- 02
एमआयएम- 01
राज्यात दीड कोटी मुस्लिम मतदार आहेत. तर लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक मतदार महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहिल्याचं चित्र होतं. त्यामुळे व्होट जिहादचा 14 मतदारसंघात फटका बसल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. भाजपने विधानसभा निवडणुकीत धार्मिक धृवीकरणावर भर देत एकही मुस्लिम उमेदवार दिला नव्हता. तर शिंदे गटाने 1, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 5 तर महाविकास आघाडीने 11 मुस्लीम उमेदवार दिले होते. त्यातून 10 मुस्लिम आमदार विजयी झाले आहेत.
राज्यातील भिवंडी पश्चिम, अंधेरी पश्चिम, वांद्रे पश्चिम, चांदिवली, अकोट, सोलापूर मध्य, संभाजीनगर पूर्व या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. अनेक ठिकाणी दोन पेक्षा जास्त मुस्लिम उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे मतविभाजनाचा थेट फायदा महायुतीला झाल्याचं चित्र आहे. यामध्ये आश्चर्य म्हणजे मुस्लिमबहुल भागात भाजपचे उमेदवार 20 ते 50 हजारांच्या फरकाने जिंकले आहेत. त्यामुळे मुस्लिम मतदारांनी महायुतीला कौल दिलाय की मतांचं विभाजन महाविकास आघाडीला मारक ठरलंय याचीच चर्चा रंगलीय.
महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटला असला तरी आता नवा मोठा तिढा निर्माण झालाय. एकनाथ शिंदे गृहखात्यावर अडून बसल्याची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्रिपद भाजपकडे असेल तर गृहमंत्रिपद मिळावं अशी आग्रही भूमिका शिंदे गटानं मांडलीय आणि यामुळेच शपथविधी लांबल्याचं बोललं जातंय. नेमका काय आहे तिढा आणि काय आहेत शिंदेंच्या अटी.
शिंदे गृहखात्यावर अडले ?
गृहमंत्रिपदामुळे शपथविधी रखडला ?
गृहमंत्रिपद देणार, तरच उपमुख्यमंत्री होणार ?
महाराष्ट्रासह दिल्लीतील राजकीय वर्तुळाचं लक्ष सध्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर कोण विराजमान होणार, याकडे लागले आहे. भाजपचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालंय़. तसंच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युलाही ठरलाय. मात्र आता एक नवा तिढा महायुतीत उभा राहिलाय आणि तो म्हणजे गृहमंत्रिपद. एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदावर अडून बसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गृहमंत्रिपदाबाबत शिंदे गटानंही तशी उघड इच्छा व्यक्त केलीय. त्यामुळे महायुतीतल्या तिढ्याचं कारण समोर आल्याचं दिसतंय.
गृहमंत्रिपद मिळालं तरच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याचं बोललं जातंय. नेमक्या त्यांच्या काय अटी आहेत ते पाहूया.
शिंदे गृहमंत्रिपदावर अडले?
1. एकनाथ शिंदेंना गृहमंत्रिपद हवं
2. गृहमंत्रिपद दिलं तरच उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार?
3. गृहमंत्रिपद न दिल्यास सरकारमध्ये सहभाग नाही?
4. फडणवीसही गृहमंत्रिपदासाठी आग्रही
5. गृहमंत्रिपदामुळेच शपथविधी लांबला?
महायुतीच्या नेत्यांची गुरुवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीनंतरही सत्तेच्या वाटाघाटीचा तिढा सुटलेला नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये काम करण्यास सांगितले होते. आता देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागणार असल्याचे सांगितले जातंय. त्यामुळे महायुतीतील एकोपा कायम राहावा म्हणून एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं, यासाठी भाजप आग्रही आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये राहणार का आणि त्याहीपेक्षा भाजप गृहमंत्रालय शिंदेंना देणार का ? हा खरा प्रश्न आहे. मात्र हा तिढा सुटल्याशिवाय शपथविधीचं अडलेलं घोडं पुढं जाणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.