Maharashtra DCM: एकनाथ शिंदेंची माघार, दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी?

Maharashtra New Chief Minister: आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. याच बैठकीत महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
Dada Bhuse
Dada BhuseSaam Tv
Published On

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मुख्यमंत्री पदावरून मोठा पेच निर्माण झाला होता. या पदावरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचंही म्हटलं जातं होतं. मात्र, या सर्व चर्चांवर एकनाथ शिंदे यांनी अखेर खुलासा केला आहे. कारण राज्यात आताही मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा पॅटर्न असणार आहे. त्यामुळे दादा भुसेंच नाव जोरदार चर्चेत आहे.

दादा भुसे यांना उपमुख्यमंत्री पदाची लॉटरी?

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडल्यानंतर उपमुख्यमंत्री पदासाठी दादा भुसे यांचं नाव आघाडीवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि मंत्री राहिलेल्या दादा भुसे यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून दादा भुसे यांना उपमुख्यमंत्री पद देण्याच्या हालचाली सुरु आहेत.

Dada Bhuse
Chandrakant Patil: एकनाथ शिंदे मन मोठं करतील, भाजपला मुख्यमंत्रिपद देतील - चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घेणार नसल्याने भुसे यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दादा भुसे सलग पाचव्यांदाआमदार झाले आहेत. एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय अशी दादा भुसे यांची ओळख आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर शिवसेनेत दाद भुसे हेच ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदावर दादा भुसे यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळआत सुरु आहे. आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. याच बैठकीत महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

Dada Bhuse
Maharashtra Weather Update: राज्याला भरली हुडहूडी! उत्तर महाराष्ट्र गारठला, कुठे किती तापमान?

दादा भुसे यांनी अनेक सामाजिक कार्ये केली आहेत. त्यांनी गोर-गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि वॉटरबॅग वाटप केले आहेत. गोर-गरीब जनतेसाठी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला. तसेच मालेगाव सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन त्यांनी केले, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब आणि हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर व समाजकार्यावर प्रभावित होऊन मालेगाव येथे जाणता राजा मंडळाच्या माध्यमातून समाजकार्यास सुरुवात व नंतर शिवसेनेत सक्रिय झाले.

Dada Bhuse
Maharashtra Political News: भाजप- राष्ट्रवादीच्या खात्यांवर शिवसेनाचा दावा? शिंदेंना हावीत मलाईदार खाती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com