Traffic News: घोडबंदर रोडवरची वाहतूक कोंडी कमी होणार; गायमुख-पायेगाव खाडी पुलाच्या पायलिंगचं ९५ टक्के काम पूर्ण

Gaimukh Payegaon bridge: गायमुख-पायेगाव चारपदरी खाडी पुलाच्या पायलिंगचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून पिअर आणि पिअर कॅप उभारणीला वेग आला आहे. १,५५१.१८ कोटींच्या या प्रकल्पामुळे घोडबंदर घाटावरील वाहतूक कोंडी कमी होऊन ठाणे, भिवंडी आणि वसईला थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
Gaimukh Payegaon bridge
Gaimukh Payegaon bridgesaam tv
Published On

घोडबंदरच्या घाटातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ट्रॅफिकमुळे गाडी चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी गायमुख-पायेगाव खाडी पूल उभारण्यात येतोय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या या प्रकल्पाच्या खाडी भागातील पायलिंगचे तब्बल ९५ टक्के काम पूर्ण झालंय. आता पिअर आणि पिअर कॅप उभारणीच्या कामाला वेग आला असून, पूल सुरू झाल्यानंतर घोडबंदर घाटाला पर्याय म्हणून प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी थेट मार्ग उपलब्ध होणार आहे.

गायमुख ते पायेगावदरम्यान चारपदरी उन्नत खाडी पूल उभारण्याची जबाबदारी ‘एमएमआरडीए’ने अशोका बिल्डकॉनला दिलीये. सध्या या दोन ठिकाणांदरम्यान जाण्यासाठी फाऊंटन हॉटेल जंक्शन, चिंचोटी आणि त्यानंतर पायेगाव असा सुमारे ३१.५ किलोमीटरचा वळसा घ्यावा लागतो. नवीन पूल झाल्यानंतर हा लांबचा मार्ग टाळता येणार आहे. त्यामुळे ठाणे, भिवंडी आणि वसई या भागांतील वाहनांना थेट मार्ग मिळणार आहे.

Gaimukh Payegaon bridge
Metro 13 Mumbai: मीरा-भाईंदर ते वसई-विरार आता काही मिनिटांत; मेट्रोसह वाहनांसाठी नायगाव खाडीवर दुमजली पूल

साडेसहा किलोमीटर लांबीच्या या चौपदरी पुलाच्या पायलिंगचे काम जवळपास पूर्ण झालंय. ज्या भागात पायलिंगचं काम पूर्ण झालंय त्या ठिकाणी पिअर उभारण्यास सुरुवात झाली असून त्यावर पिअर कॅप बसवण्याचं कामही सुरू आहे. आतापर्यंत संपूर्ण प्रकल्पाचं २५ टक्के काम पूर्ण झालंय. पुलाचं बांधकाम ४२ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी एक हजार ५५१.१८ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आलीये.

ठाणे आणि परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या ‘एमएमआरडीए’च्या वाहतूक आराखड्यात या पुलाचा महत्त्वाचा समावेश आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, ठाणे कोस्टल रोड, विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर, दिवा-वसई रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्ग ४८ तसंच अंजूर-चिंचोटी रस्ता या विविध प्रकल्पांशी हा पूल जोडला जाणार आहे. त्यामुळे ठाणे शहराची वाहतूक आणि आर्थिक केंद्र म्हणून असलेलं महत्त्व आणखी वाढण्यास मदत होईल, अशी माहिती ‘एमएमआरडीए’ने दिलीये.

Gaimukh Payegaon bridge
Metro 13 Mumbai: मीरा-भाईंदर ते वसई-विरार आता काही मिनिटांत; मेट्रोसह वाहनांसाठी नायगाव खाडीवर दुमजली पूल

भविष्यात वाहतुकीला चालना

ठाण्यातील घोडबंदर रोडवर नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा असते. ठाणे शहरातून मुंबईच्या पश्चिम उपनगरांकडे, मिरा-भाईंदरकडे तसंच मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या दिशेने जाणारी वाहतूक याच मार्गावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे गायमुख-पायेगाव पूल सुरू झाल्यानंतर या भागातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास आणि प्रवास अधिक सोपा होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com