Uddhav Thackeray vs CM Shinde: ठाकरेंनी केली शिंदेंची मिमिक्री; मुख्यमंत्री शिंदेंचाही उद्धव ठाकरेंवर पलटवार

Thackeray vs CM Shinde: विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकनाथ शिंदेंना लक्ष करायला सुरुवात केलीय. त्यातच आता ठाकरेंनी मेळाव्यात एकनाथ शिंदेंची मिमिक्री केली. त्यावरून आरोप-प्रत्यारोप रंगलेत. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....
Uddhav Thackeray vs CM Shinde:  ठाकरेंनी केली शिंदेंची मिमिक्री; मुख्यमंत्री शिंदेंचाही उद्धव ठाकरेंवर पलटवार
Uddhav Thackeray vs CM Shinde
Published On

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल करत थेट शिंदेंच्या बोलण्यावर टीका केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही ठाकरेंना मिमिक्री करण्याशिवाय काही काम राहिलं नसल्याची टीका केलीय.

विधानसभा निवडणूकीपुर्वी उद्धव ठाकरेंनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केलीय. त्यातच ठाकरेंची भूमिका मुस्लिमधार्जिणी असल्याची टीका शिंदे गट आणि भाजपकडून करण्यात येतीय. त्यामुळे आपण हिंदूत्व सोडलं नसल्याचं बिंबवण्यासाठी ठाकरेंनी राज्यभर भगवा सप्ताह आयोजित केला होता. त्याचा समारोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल करत जोरदार टोलेबाजी केली.

तर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना जंगलात फोटो काढण्यासाठी पाठवलं असतं, असं म्हणत पलटवार केलाय. लोकसभा निवडणूकीत उद्धव ठाकरेंनी पक्षफोडीचा मुद्दा उपस्थित करत शिंदेंना लक्ष केलं. मात्र त्याचा थेट फायदा झाला नाही. त्यामुळे आता विधानसभेसाठी ठाकरेंनी उचललेला हिंदूत्वाचा मुद्दा आणि एकनाथ शिंदेंवरील टीका मतदारांना रुचणार की लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही फटका बसणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Uddhav Thackeray vs CM Shinde:  ठाकरेंनी केली शिंदेंची मिमिक्री; मुख्यमंत्री शिंदेंचाही उद्धव ठाकरेंवर पलटवार
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अलर्ट मोडवर, खासदार-आमदारांना महत्वाच्या सूचना, मातोश्रीवरील बैठकीत काय काय झालं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com