Uddhav Thackeray Shiv Sena : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (maharashtra politics news today) पार्शभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरु केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आज मातोश्रीवर राज्यातील शिवसेना आमदार-खासदार आणि नेत्यांची आढावा बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा आशा सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय आपला कोणता नेता सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात आहे का? याचीही चाचपणी करण्यास नेत्यांना सांगितलेय. आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीला आमदार, खासदार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. विनायक राऊत, दत्ता दळवी, सुभाष देसाई, अमोल कीर्तीकर, अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर, ओम राजे निंबाळकर आणि विविध भागातील नगरसेवक, पदाधिकारी मातोश्रीमध्ये झालेल्या बैठकीला उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागा, आशा सूचना उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांना आणि आमदारांना दिल्या आहेत. लोकसभा निवडणूकीत ज्या चुका झाल्या असतील त्या चुका विधानसभेत होऊ नये, याची काळजी घेतली गेली पाहिजे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
विधानसभेत मशाल जास्तीत जास्त घरो-घरी कशी पोहोचवता येईल, याची देखील चर्चा आजच्या बैठकीत झाली.येत्या 16 तारखेला महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे.. त्यासाठी देखील तयारी लागण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी आपल्या नेत्यांना दिले आहेत.
उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलर्ट मोडवर आहेत. त्यांनी आज मातोश्रीवर घेतलेल्या बैठकीत सावध पवित्रा घेतला. त्याशिवाय प्रत्येक संपर्क प्रमुखांना तालुका निहाय्याद्या याद्या दिल्या आहेत.
तालुका निहाय याद्यांमध्ये, स्थानिक गटप्रमुखांपासून ते ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची संपूर्ण इत्यंभूत माहिती व हालचालींवर लक्ष ठेवावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
या गटप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आढावा घेण्याच्या ठाकरेंकडून संपर्कप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय शिंदेच्या शिवसेनेसोबत आपला कोणता पदाधिकारी संपर्कात आहे का? याची देखील चाचपणी करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.