

Sambhajinagar News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी नांदेड येथील सभेमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी फक्त मुख्यमंत्री पदासाठी गद्दारी करुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली असल्याची टीका अमित शाह यांनी केली होती.
त्यांच्या या टीकेवरुन आता ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadad Danve) यांनी याच मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. 'सातत्याने केसाने गळा कापणाऱ्या भाजपसोबत कोणीही मित्र राहू शकत नाही.', अशी टीका त्यांनी केली.
भाजपवर टीका करताना अंबादास दानवे यांनी सांगितले की, 'जो सातत्याने मित्राला धोका देतो. केसाने गळा कापतो. अशा लोकांबरोबर कोणीही मित्र राहू शकत नाही. विविध राज्याने देशाने हे अनुभवले आहे. भारतीय जनता पक्षाने ज्याच्यासोबत मैत्री केली आहे. त्यांचा केसाने गळा कापला आहे. याचे शिवसेना उदाहरण आहे. शिवसेनेत गद्दारी करायला यांनीच लावले आहे.'
तसंच, 'पासवान यांची पार्टी भाजपनेच फोडली. अकाली दल यांचा मित्र होता. नितीश कुमार मित्र असून दूर का गेला? असा सवाल करत अंबादास दावे यांनी केला. 'मला असे वाटते यांची प्रवृत्ती अशी असल्यामुळे यांचा मित्र कोणीच होऊ शकत नाही.', असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, अंबादास दानवे यांनी ट्वीट करुन देखील भाजपवर निशाणा साधला. त्यांनी या ट्वीटमध्ये भाजपने ज्यांच्यासोबत युती केली त्यां पक्षासोबतच व्यक्तींची नावं दिली आहेत.
त्यांनी ट्विटमध्ये असे सांगितले की, 'युती तोडून शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असा आरोप विरोधक सातत्याने आमच्यावर करतात. काल केंद्रीय गृह मंत्री अमित शाह पण बोलले. मग ज्यांचे नाव मी खाली देतोय, यांच्याशी युती करून भाजपने कोणतं हिंदुत्व साधलं होतं?', असा सवाल त्यांनी केला.
या ट्वीटमध्ये त्यांनी फारुख अब्दुल्ला (यांचा मुलगा वाजपेयी सारकरमद्धे केंद्रीय मंत्री होता), मेहबूबा मुफ्ती, अकाली दल, ओम प्रकाश चौटला, मायावती (भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री), नितीश कुमार, ममता बॅनर्जी. (भाजप सरकारमध्ये रेल्वे मंत्री राहिलेले), नवीन पटनायक, चंद्राबाबू नायडू, देवेगौडा यांचा जनता दल.' यांची नावं दिली आहेत.
'अजून साधारण 20 नावं माझ्याकडे आहेत. 2024 लोकसभेपुर्वी यांच्यापैकी कोणी गळाला लागतो का, याचे प्रयत्न सध्या भाजपकडून सुरूच आहेत. महाराष्ट्रात मात्र ही डाळ शिजणार नाही. सेक्युलर चेहरे असलेल्या लोकांशी हे देशभर युती करत फिरणार, पण यांचं हिंदुत्व शाबूत, अन् आम्हीच सोडलं म्हणता. असं कसं चालेल?', असा सवालही अंबादास दानवे यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.