Beed news: बीडमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार, तरुणावर कुऱ्हाड अन् चाकूने सपासप वार

Maharashtra crime: बीडच्या गेवराई परिसरात तरुणावर कुऱ्हाड, चाकू आणि रॉडने क्रूर हल्ला करण्यात आला. प्रकरण मागे घेण्याच्या मागणीवरून हा हल्ला झाल्याची माहिती असून सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Beed news
Beed newsSaam Tv
Published On

बीड जिल्ह्यातील गेवराई शहराजवळ 26 मे रोजी रात्री एक गंभीर आणि धक्कादायक घटना घडली. मंगेश भुराजी शिंदे या तरुणावर काही जणांनी जीवघेणा हल्ला केला. “तुझ्या बहिणीने माझ्यावर दाखल केलेली बलात्काराची केस मागे का घेत नाहीस?” असं म्हणत आरोपींनी हा हल्ला केल्याचं समोर आलंय.

घटनेदरम्यान मंगेशचा मित्रही त्याच्यासोबत होता. मात्र आरोपींनी त्याला पिस्तुलचा धाक दाखवत घटनास्थळावरून दूर पळवून लावलं. त्यानंतर मंगेशवर कुऱ्हाड, चाकू आणि लोखंडी रॉडने वार करण्यात आले. इतकंच नाही तर त्याला दगडानेही मारहाण करण्यात आली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

Beed news
Jalgaon news: ACB ने सील केलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरी चोरी, मध्यरात्री अचानक चोर घुसले अन्...

जखमी अवस्थेत मंगेशला तातडीने बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर अनेक दिवस उपचार सुरू होते. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी सचिन राठोड, अरबाज शेख आणि इतर तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप आरोपी फरार असून त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. त्यामुळे त्यांच्यापासून आपल्या कुटुंबाला धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Beed news
Pune news: पुण्यात पुन्हा बिश्नोई गँगची दहशत? व्यापाऱ्याला थेट २ कोटींची खंडणी मागत जीवे मारण्याची गंभीर धमकी

हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर

या पार्श्वभूमीवर पीडित तरुणाच्या आईने बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे तातडीने कारवाई करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून त्यामध्ये आरोपी अत्यंत क्रूरपणे तरुणाला मारहाण करत असल्याचं दिसते. रात्रीच्या अंधारात वारंवार येऊन जखमी अवस्थेत पडलेल्या मंगेशला पुन्हा-पुन्हा मारहाण केल्याचेही या फुटेजमध्ये स्पष्ट होतंय.

Beed news
Pune : पुण्यात भयंकर घडलं! निवारागृहातील कर्मचाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं हादरवणार कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com