Ahmednagar Accident: अहमदनगर- दौंड महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू; ८ जखमी

Ahmednagar Daund Highway Accident: अहमदनगर दौड महामार्गावर ट्रक आणि झायलो कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून ८ जण जखमी झालेत.
Ahmednagar Daund Highway Accident:
Ahmednagar Daund Highway Accident:Saamtv
Published On

सुशील थोरात, अहमदनगर|ता. ३१ डिसेंबर २०२३

Ahmednagar Accident News:

सर्वत्र थर्टीफस्ट आणि नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरु असतानाच अहमदनगरमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अहमदनगर दौंड महामार्गावर ट्रक आणि झायलो कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून ८ जण जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, अहमदनगर दौंड महामार्गावर रविवारी (३१ डिसेंबर) सकाळी ११ वाजता ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. कारमधील सर्वजण हे श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील दर्गाच्या दर्शनासाठी कल्याण वरून नगरकडे येत होते. यावेळी दौंडजवळ त्यांच्या एसयुव्हीची आणि भरधाव ट्रकची धडक झाली.

ही धडक इतकी भीषण होती की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण जखमी झालेत. शाबाज अजीज शेख (वय, ३०) गाजी रउफ बांगी (वय, १३) व मुलगी लुजैन शोएब शेख - (वय, १३) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर इतर ८ जण जखमी झालेत. हे सर्वजण कल्याणमधील राहणारे असल्याचे सांगण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ahmednagar Daund Highway Accident:
New Year Celebration: थर्टी फस्टची तयारी, नववर्षाचे स्वागत.. पर्यटनस्थळे, देवस्थाने गर्दीने फुलली!

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींमधील काहींना दौड तर काहींना श्रीगोंदा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. देवदर्शनाला जाताना काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Ahmednagar Daund Highway Accident:
Chandrakant Patil News : माढ्याच्या उमेदवारीचा तिढा तिन्ही पक्षाचे नेते बसून सोडवतील; संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com