

अहमदनगर - अकोले शहरालगत असलेल्या नवले वाडी येथील घरांमध्ये अवैध रेसिंगचा तांदूळ आढळून आला आहे. आयशर टेम्पो रेशनिंगचे 182 कट्ट्याचे वाहन असा 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दत्ता सुदाम चोथवे व खंडू काशिनाथ भारमल यांच्याविरोधात अकोले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील पहा -
अकोले तालुक्यात चार महिन्यापूर्वी राजुर पोलिस स्टेशन समोर अवैद्य रेशन भरलेल्या तीन गाड्या पकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा रेशनिंगचा तांदूळ पकडल्याची घटना घडली आहे.
अकोलेल्यातील नवले वाडी येथील प्रमोद भिकाजी नवले यांच्या गोडाउन मध्ये महाराष्ट्र शासन शिक्का असलेल्या गोण्यांमध्ये रेसिंगचा तांदूळ धान्य साठा रात्री 1 वाजता भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल देशमुख व शंभु नेहे यांनी पाळत ठेवून पकडून दिला आहे. अकोले पोलिसात रात्री उशिराने पुरवठा अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्ता चोथवे व खंडू भारमल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.