फेसबुकचा आणखी एक मोठा निर्णय, 'हे' फिचर होणार बंद

पण, हा फिचर बंद करण्यावरून अनेक लोकांनी टीका देखील केली आहे.
फेसबुकचा आणखी एक मोठा निर्णय, 'हे' फिचर होणार बंद
फेसबुकचा आणखी एक मोठा निर्णय, 'हे' फिचर होणार बंदSaam Tv

काही दिवसांपूर्वी फेसबुक कंपनीने आपल्यात नावात बदल केले आहे. आता काल (२ नोव्हेंबर) फेसबुक कंपनीने पुन्हा एक नवीन घोषणा केली आहे. फेसबुकवरील Auto Face Recognition system लवकरच बंद करण्यात येणार आहे. यामुळे फेसबुकवर फोटो किंवा व्हिडीओ अपलोड झाला की त्यात कोण व्यक्ती आहेत हे आपोआप ओळखणं आणि त्या व्यक्तींना टॅग करण्यासाठीचे नोटिफिकेशन आता बंद होणार आहे.

फेसबुकने Auto Face Recognition system वापरण्यास सुरुवात केली. यानंतर फेसबुकवरील फोटो आणि व्हिडीओमध्ये आपोआप टॅगिंग सुरू झाले. हा अनुभव वापरकर्त्यांसाठी नवा होता आणि त्यामुळे सुरुवातीला अनेक वापरकर्त्यांनी स्वतःला आपोआप टॅग करून घेण्यासाठी हे फिचर वापरण्यासाठी फेसबुकला परवानगी दिली.

हे देखील पहा -

फेसबुकच्या या निर्णयानंतर आता ज्या वापरकर्त्यांनी आधी Auto Face Recognition ला परवानगी दिली होती त्यांचेही आपोआप टॅगिंग बंद होणार आहे. इतकेच नाही तर Auto Face Recognition साठी गोळा करण्यात आलेल्या चेहऱ्यांचा कोट्यावधी लोकांचा डेटा फेसबूक डिलीट करणार आहे. येत्या डिसेंबरपर्यंत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पण, हा फिचर बंद करण्यावरून अनेक लोकांनी टीका देखील केली आहे. कारण हे फिचर किरकोळ विक्रेते, रुग्णालये आणि इतर व्यवसायांमध्ये सुरक्षिततेच्या उद्देशाने लोकप्रिय आहे.

फेसबुकचा आणखी एक मोठा निर्णय, 'हे' फिचर होणार बंद
नागपूरमधील भयानक घटना! कुख्यात गुंडाचा दगडाने ठेचून खून

का घेतलाफेसबुकने हा निर्णय ?

या तंत्रज्ञानाच्या वापरातील नैतिकतेबाबत उपस्थित होत असलेले प्रश्न आणि त्यातील वाढते धोके लक्षात घेत फेसबुकने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. ऑटो फेस रिकॉग्निशनमुळे अनेकांनी खासगीपणाचा भंग होत असल्याचा आरोप केला होता. तसेच यामुळ पाळत ठेवण्याचा धोका वाढल्याचंही टीकाकारांचे म्हणणं होते. त्यामुळेच एकूणच तंत्रज्ञानाचा वापर करताना नैतिकता ठेवण्याच्या आग्रहापोटी फेसबुकने हा निर्णय घेतला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com