शिक्षक दिनाच्या दिवशीच शिक्षकांवर मोर्चा काढण्याची वेळ; सरकारचा केला जोरदार निषेध

Maharashtra Teachers Protest For Old Pension Scheme: शिक्षक दिनाच्या दिवशी बुलढाण्यात शेकडो शिक्षकांचा जुनी पेन्शन योजनेसाठी मूकमोर्चा काढण्यात आला. 26 हजार शिक्षकांच्या मागणीवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षकांनी केली.
Teachers Protest On Teachers Day In Buldhana Over Old Pension Scheme
Teachers Protest On Teachers Day In Buldhana Over Old Pension Schemesaam tv
Published On

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: शिक्षक दिनाच्या दिवशीच शिक्षकांवरव मोर्चा काढण्याची वेळ आली असून शिक्षकांनी काळी फिती बांधून सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवला. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजनेच्या प्रमुख मागणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातील शेकडो शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते.

Teachers Protest On Teachers Day In Buldhana Over Old Pension Scheme
'शाळांची स्थिती सुधारा, सुविधा द्या! CJP च्या पोलखोलनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली शालेय शिक्षणमंत्री भुसेंची क्लास

राज्यात जवळपास 26 हजार शिक्षक जुन्या पेन्शनच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारने या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक संघटनेने दिला आहे.

Teachers Protest On Teachers Day In Buldhana Over Old Pension Scheme
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांचा दुष्काळ? शिक्षकांच्या २,६५७ रिक्त पदांवरून खासदारांचं शाळेच्या आवारात उपोषण सुरु

या आंदोलनाची सुरुवात शिक्षकांनी 1 सप्टेंबरपासून हाताला काळ्या फिती बांधून केली आहे. 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या अनेक शिक्षकांच्या शाळा नंतर 100 टक्के अनुदानावर आल्या. मात्र, सरकारने 2010 मध्ये काढलेल्या एका शासन निर्णयामुळे या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित राहावे लागले असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com