बदलापूर अत्याचाराची घटना ताजी असतानाच बीडमध्येही एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका 11 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीच्या शिक्षकानेच तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
शिक्षक दिनाच्या दिवशीच हा प्रकार उघडकीस आला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड (Beed) शहरात पीडित मुलगीही एका खासगी शिकवणीत उर्दू व अरबी भाषेचे शिक्षण घेत होती. या ठिकाणी 100 ते 150 च्या जवळ मुले मुली शिक्षण घेत आहेत. याच ठिकाणी पीडिता देखील शिक्षण घेते. मात्र ती ज्यावेळी शिकवणीत जाण्यास नकार देऊ लागली, त्यानंतर आई-वडीलांनी तिला याबाबत विचारांनी केली. यानंतर पीडित मुलीने जे सांगितलं ते एकूण तिच्या आई आणि वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.
या 11 वर्षीय पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आई आणि वडिलांना सांगितला. यानंतर पीडितांच्या आई- वडिलांनी नातेवाईकांना सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत सांगण्यात आलं आहे की, पीडित मुलीवर नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी शिकवणी घेणाऱ्या या शिक्षकाने मुलीवर अत्याचार केले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी शांतता समितीचे सदस्यांना बोलवून पीडित आणि तिच्या आईचा व्हिडीओ रेकॉर्डिंग करत जबाब नोंदवला आहे. आरोपी हा मुलीवर अत्याचार करण्याआधी इतर मुलांना बाहेर पाठवायचा. यानंतर तो मुलीवर अत्याचार करायचा. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.