Pankaja Munde : मी कुणासमोर झुकणार नाही, पंकजा मुंडेंचा कुणाला इशारा?

Pankaja Munde News : भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी अहमदनगर दौऱ्यावर असताना मोठं वक्तव्य केलं. मी कुणासमोर झुकणार नाही, असे म्हणत भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
मी कुणासमोर झुकणार नाही, पंकजा मुंडेंचा इशारा कुणाला?
Pankaja Munde Saam tv
Published On

सचिन बनसोडे, साम टीव्ही प्रतिनिधी

अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी राज्यभरात दौरे सुरु केले आहेत. भाजप आमदार पंकजा मुंडे यांचा दौरा अहमदनगरपर्यंत पोहोचला आहे. आज भाजप आमदार मुंडे यांनी अहमदनगरमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका देखील स्पष्ट केली. 'मी थकणार नाही, वाकणार नाही. मी कुणासमोर कधीच झुकणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पुढील भूमिका स्पष्ट केली आहे.

आमदार पंकजा मुंडे यांना भाजपने राज्यातील काही विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. भाजपने जबाबदारी दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी दौरे सुरु केले आहेत. या निमित्त पंकजा मुंडे यांचा दौरा नगर जिल्ह्यात पोहोचला. यावेळी नगरमधील एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांसमोर महत्वाचं भाष्य केलं.

मी कुणासमोर झुकणार नाही, पंकजा मुंडेंचा इशारा कुणाला?
Samarjeet Ghatge : विधानसभेआधी महायुतीला पहिला धक्का दिलेले समरजित घाटगे नक्की कोण आहेत? छत्रपतींच्या घराण्याशी काय आहे संबध?

पंकजा मुंडे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

विखे आणि मुंडे कुटुंबीयांचे कौटुंबिक संबंध आहेत. आमच्या मोठ्या लोकांनी जे केले, ते आम्हाला करणं शक्य नाही. आमची इतर कुणाशीही स्पर्धा नाही. आमची स्पर्धा आमच्याच मोठ्या लोकांशी आहे. मी चुकले तर, लोक मला मुंडे साहेबांची आठवण करून देतात.

माझा उल्लेख आमदार, विधानपरिषद सदस्य केला. माझ्या डोक्यात ट्यूबच पेटत नाही, माझ्या लक्षातच येत नाही. आपली ओळख पदामुळे नाही तर कामामुळे झाली पाहिजे. शासकीय कार्यालये हे दादागिरी करण्याचे स्थान नाही. इथे लोकांची कामे झाली पाहिजे.

मी कुणासमोर झुकणार नाही, पंकजा मुंडेंचा इशारा कुणाला?
Rahuri Assembly Election : राहुरीत यंदा 'तुतारी विरुद्ध घड्याळ' सामना रंगणार? काय आहे मतदारसंघात राजकीय परिस्थिती? घ्या जाणून...

पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारे मुंडे साहेब आज नाहीत. मात्र, तुमच्या सर्वांच्या डोळ्यांमध्ये मला त्यांचे आशिर्वाद दिसत आहेत. कितीही वेळा मोडून पडले, तरी तुम्ही पाठीवर थाप द्या.

मी वचन देते. मी थकणार नाही, वाकणार नाही. मी कुणासमोरही कधीच झुकणार नाही.उतनार नाही आणि मातनार नाही. जनसेवेचा वसा टाकणार नाही.

निवडणुका येतात आणि जातात. जय पराजय होतच असतो. पण आपण मन मोठे ठेवले पाहिजे. हेच मुंडे साहेबांचे संस्कार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com