बीड : एप्रिल व मे या दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीची मदत मिळणार असून बीड जिल्ह्यातील अवकाळी पीडित शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. दोन महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त ८ हजार ४७६ शेतकऱ्यांना आता ६ कोटी ९९ लाख रुपये मिळणार आहेत.
या वर्षात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला होता. या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. अवकाळी पावसानंतर महसूल व कृषी विभागाने पंचनामे केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने राज्य शासनास नुकसानी संदर्भाने निधीची मागणी केली होती. शिवाय शेतकऱ्यांना (Farmer) देखील या नुकसान भरपाईची प्रतीक्षा होती. परंतु शासनाकडून आता हा मदत निधी देण्यास मंजुरी देण्यात आली असून शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळाला आहे.
खात्यात जमा होणार रक्कम
राज्य शासनाने एप्रिल व मे या दोन महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी (Beed) बीड जिल्ह्यातील ८ हजार ४७६ शेतकऱ्यांना ६ कोटी ९९ लाख रुपये देण्यास मंजुरी दिली आहे. सदरील रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे..यामुळं आता ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.