Marathwada Flood update
Marathwada Flood Saam tv

Marathwada Flood : मतदानासाठी मदतीचं कीट, विरोधकांचा आरोप; माजी मंत्री तानाजी सावंतांनी काय प्रत्युत्तर दिलं?

Marathwada Flood update : अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झालाय.. या उद्ध्वस्त झालेल्या धाराशिवच्या शेतकऱ्यांना शिंदेसेनेनं मदतीचं कीट दिलंय.. मात्र त्यावरुन राजकारण तापलंय. त्याचं नेमकं कारण काय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.....
Published on

हा संताप आहे धाराशिवमधील शेतकऱ्यांचा.... आणि त्याला कारण ठरलंय मदतीच्या कीटवर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे छापलेले फोटो.. एवढंच नाही तर जाहिरातबाजीच्या नादात 3 दिवस मदतीसाठी उशीर केल्याचं सांगत तुमची मदत नको, ती माघारी घेऊन जा म्हणत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय...

Marathwada Flood update
Ind vs Ban : आधी फटकेबाजी नंतर घुसरगुंडी; हार्दिक-अक्षरची संयमी खेळी, बांगलादेशसमोर इतक्या धावांचं आव्हान

आठवडाभरापासून मराठवाड्यावरचं आभाळ फाटलंय... लाखो हेक्टरवरची पीकं पाण्याखाली गेलेत.. अनेक घरात पाणी शिरलंय... भिंत खचलीय... चूल विझलीय...शेतकऱ्याकडे होतं नव्हतं ते सगळं मातीमोल झालंय.. शेतकरी ठोस मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक धाराशिव दौऱ्यावर आहेत.. मात्र या दौऱ्यादरम्यानच मदतीच्या कीटवर जाहिरातबाजी केल्यानं विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय..तर याच मुद्द्यावरुन राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय...

दुसरीकडे राऊतांची टीका सत्ताधाऱ्यांना चांगलीच जिव्हारी लागलीय.. त्यावरुन शिंदे सेनेने राऊतांवर पलटवार केलाय...

Marathwada Flood update
Ladakh Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण; भाजप कार्यालय पेटवलं, कुठे घडली घटना?

राज्यातील 3600 गावं अतिवृष्टीने बाधित झालेत...निम्म्या महाराष्ट्रावर ओल्या दुष्काळाचं संकट आहे... आणि त्यातही शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर मारण्याऐवजी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन मतांसाठी मदतीचं कीट वाटलं जात असेल तर राजकारण्यांमध्ये संवेदनशीलता उरली आहे का? असाच सवाल निर्माण झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com