दक्षिणेत मराठीचा डंका! तामिळनाडूमध्ये २३ सप्टेंबरला ऐतिहासिक साहित्य संमेलन

First Marathi Literature Conference In South India Thanjavur 2026: तामिळनाडूतील तंजावर येथे २३ सप्टेंबर २०२६ रोजी सरफोजीराजे भोसले द्वितीय यांच्या जयंतीनिमित्त भव्य मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
Historic announcement of the first Marathi Literature Conference in Thanjavur celebrating the legacy of King Sarfoji II
Historic announcement of the first Marathi Literature Conference in Thanjavur celebrating the legacy of King Sarfoji IIsaam tv
Published On

मराठी भाषा आणि संस्कृतीच्या इतिहासात एक अत्यंत सुवर्ण आणि ऐतिहासिक पान जोडलं जाणार आहे. दक्षिणेतील मराठी संस्कृतीची पंढरी समजल्या जाणाऱ्या तामिळनाडूतील तंजावर नगरीत येत्या २३ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य ' सरफोजीराजे व्दित्तीय मराठी साहित्य संमेलन' आयोजित करण्यात आलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे, तंजावरचे महान आणि विद्वान राजे 'सरफोजीराजे भोसले द्वितीय' यांच्या जयंतीचं औचित्य साधून या संमेलनाचं आयोजन केलं जाणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच तंजावरमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीत या ऐतिहासिक संमेलनावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, महाराष्ट्राचे माजी उच्च शिक्षण मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे."

Historic announcement of the first Marathi Literature Conference in Thanjavur celebrating the legacy of King Sarfoji II
शिंदे गटाचा काँग्रेसला दे धक्का! बड्या नेत्यानं सोडली पक्षाची साथ, शिवसेनेत घेतला प्रवेश

तंजावरचे भोसले घराणे हे केवळ शौर्यासाठीच नाही, तर ज्ञान, विज्ञान आणि साहित्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. ज्यांच्या जयंतीनिमित्त हे संमेलन होत आहे, ते राजे सरफोजी द्वितीय हे खऱ्या अर्थाने एक अद्वितीय 'बहुभाषिक' पंडित होते. त्यांना मराठी, संस्कृत, तमिळ, तेलुगू या भारतीय भाषांसह इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, लॅटिन अशा तब्बल १० हून अधिक भाषा अवगत होत्या. त्यांनी जगभरातून ३९,००० पेक्षा जास्त दुर्मिळ हस्तलिखिते गोळा केली आणि जगातील सर्वात जुन्या 'तंजावर महाराज सरफोजी सरस्वती महाल ग्रंथालयाची' स्थापना केली. राजे सरफोजींनी स्वतः वैद्यकशास्त्र, कला, नाटक आणि विज्ञानावर विपुल लेखन केलं. त्यांनी लिहिलेलं 'देवेंद्र कुरवंजी' हे मराठी नृत्यनाट्य जगप्रसिद्ध आहे. एवढंच नाही तर आरोग्य क्षेत्रात 'तंजावर धन्वंतरी महाल' स्थापन करून त्यांनी स्वतः डोळ्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे तंत्र विकसित केले होते. कला, शिक्षण आणि दक्षिण भारतात पहिले मोडी आणि देवनागरी लिपीचे छापखाने सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

Historic announcement of the first Marathi Literature Conference in Thanjavur celebrating the legacy of King Sarfoji II
मंत्र्याचा राजीनामा घेतला म्हणून सरकारची सत्ता जात नाही; अण्णा हजारेंचं थेट पीएम मोदींना पत्र

तंजावर ही मराठी संस्कृतीची दक्षिणेतील पंढरी आहे. राजे सरफोजी द्वितीय यांचं साहित्य, विज्ञान, भाषाप्रभुत्व आणि कलेतील योगदान आजही संपूर्ण जगाला दिशा देणारं आहे. अशा क्रांतीकारी राजाच्या जयंतीदिनी, तंजावरच्या भूमीत हे संमेलन होणे हा मराठी भाषेचा आणि इतिहासाचा परमगौरव आहे. प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या स्वागताध्यक्षतेखाली हे संमेलन ऐतिहासिक ठरेल यात शंका नाही. दक्षिण भारतात होणारे हे पहिलेच मराठी साहित्य संमेलन आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com