Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांसह १८ जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल, बुलडाण्यातील शेतकरी आंदोलन चिघळल्याप्रकरणी कारवाई

बुलडाण्यात रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आत्मदहनाचा प्रयत्न केसा होता.
Ravikant Tupkar
Ravikant Tupkarsaam tv

>> संजय जाधव

बुलडाणा : स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांच्यासह १८ जणांविरोधात पोलिसांना गुन्हा दाखल केले आहे. बुलडाण्यात रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आत्मदहनाचा प्रयत्न केसा होता.

प्रकरण चिघळल्यानंतर पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला होता. या प्रकरणात पोलिसांनी 18 जणांवर रात्री उशिरा दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत.

तसेच सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आंदोलनकर्त्यांना चिखली पोलीस स्टेशनमध्ये कोठाडीत ठेवण्यात आले आहे. आज दुपारी बुलडाणा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Ravikant Tupkar
Megablock News: मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक चेक करा

कापूस आणि सोयाबीनच्या दरवाढीसह पीकविमा व अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी बुलडाण्यात काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं. रविकांत तुपकर यांनी आंदोलनादरम्यान आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता.

गेल्या तीन दिवसांपासून भूमिगत असलेल्या तुपकरांनी बुलडाण्यात अचानक पोलिसांच्या वेशात येत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेनंतर तुपकर यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले.

Ravikant Tupkar
VIDEO : राज्य सरकार जनरल डायरची औलाद आहे काय? राजू शेट्टी संतापून म्हणाले, बळीराजा तुम्हाला गाडल्याशिवाय..,

दरम्यान आंदोल चिघळल्याने कायदा सुव्यवस्थेतची परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलन सुरु असतानाच कार्यकर्त्यानी दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करत रविकांत तुपकरांना ताब्यात घेतले होते. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com