VIDEO : राज्य सरकार जनरल डायरची औलाद आहे काय? राजू शेट्टी संतापून म्हणाले, बळीराजा तुम्हाला गाडल्याशिवाय..,

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला असून राज्य सरकारला कडक शब्दात इशारा दिला आहे.
Raju Shetty criticizes Shinde-Fadnavis government
Raju Shetty criticizes Shinde-Fadnavis governmentSaam TV
Published On

Raju Shetti News : कापूस आणि सोयाबीनच्या दरवाढीसह पीकविमा व अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी बुलडाण्यात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जमावावर पोलिसांनी लाठीमार केला. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला असून राज्य सरकारला कडक शब्दात इशारा दिला आहे. (Maharashtra Political News)

Raju Shetty criticizes Shinde-Fadnavis government
Devendra Fadnavis : हे गद्दारांचं नाही तर खुद्दारांचं सरकार; फडणवीस छाती ठोकत म्हणाले, गद्दार तर..,

पीक विम्याची रक्कम, सोयाबीन कापसाचा भाव मागणाऱ्या शेतकऱ्यांवर तुम्ही लाठ्या चालवता. पोलिस बळाचा वापर केला जातो. जनरल डायरने जन्माला घातल्यागत पोलिस वागतात, पण राज्य सरकारला इतकंच सांगायच आहे, तुम्ही कितीही लाठ्या काठ्या घाला शेतकरी मागे हटणार नाही, असं राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर हा बळीराजा एक दिवस तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या रविकांत तुपकरांवर कारण नसताना वेगवेगळे गुन्हे दाखल करून वेठीस धरणार असाल, तर लक्षात ठेवा याची किंमत तुम्हाला भविष्यात चुकती करावी लागेल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी शिंदे-फडणवीस  (Devendra Fadnavis) सरकारला दिला आहे.  

काय आहे प्रकरण?

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकर यांनी आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन दिवसांपासून भूमिगत असलेल्या तुपकरांनी आज बुलढाण्यात अचानक पोलिसांच्या वेशात येत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेनंतर तुपकर यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. (Latest Marathi News)

दरम्यान, हे आंदोलन सुरु असतानाच कार्यकर्त्यानी दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करत रविकांत तुपकरांना ताब्यात घेतले. यावेळी रविकांत तुपकर यांनी देखील संताप व्यक्त केला. हे लाज नसलेलं सरकार आहे, हे सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून फक्त घोषणा करत आहे. कृती शून्य आहे, असं तुपकर यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com