Devendra Fadnavis : हे गद्दारांचं नाही तर खुद्दारांचं सरकार; फडणवीस छाती ठोकत म्हणाले, गद्दार तर..,
Devendra Fadnavis News : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे विशेष परिस्थितीमध्ये तयार झालेलं आहे. हे गद्दारांचे नाही, खुद्दारांचे सरकार आहे. गद्दारांचं सरकार तर ते होतं जे २०१९ साली जनतेने दिलेल्या मताचा अवमान करून पाठीत खंजीर खुपसून स्थापन झालं. त्या गद्दारांच्या सरकारमधून खुद्दार बाहेर पडले आणि गद्दार खाली पडले, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Maharashtra Political News)
भाजपची (BJP) दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक शुक्रवारपासून नाशिकमध्ये आहे. आज या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री आणि भाजपचे प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीसांनी हे गद्दारांचं नाही तर खुद्दारांचं सरकार आहे, असं म्हणत ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
'नाशिक ही भूमी निवृत्तीनाथाची भूमी आहे. भाजपने याच भूमीत 'शत-प्रतिशत'चा नारा दिला होता तीच ही भूमी आहे. आपण दिलेल्या नाऱ्यामुळे महाराष्ट्रात पहिला पक्ष भाजप आहे हे आपण दाखवून दिलं. मला काय मिळणार हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत सोडून द्या. पदे मिळतील पदे मिळणार नाहीत. पण सध्या काम करा. त्यानंतर जनता आपल्याला पुन्हा एकदा संधी देईल', असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यावेळी म्हणाले.
'महाराष्ट्राचे मागील अडीच वर्ष वाया गेले. अडीच वर्ष मागच्या सरकारमध्ये काहींनी घरं भरण्याचे कामं केले. मात्र, आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे जनतेचे सरकार आहे. आम्ही आता 20-20 ची बॅटिंग सुरू केली आहे आणि ही बॅटिंग 2024 सालीही दिसेल', असंही यावेळी फडणवीस म्हणाले.
'हे गद्दारांचे नाही, खुद्दारांचे सरकार'
हे गद्दारांचे नाही, खुद्दारांचे सरकार आहे. जनतेचा विश्वासघात करुन महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेच, पण पुन्हा दीडपट संख्या घेऊन परत येऊ. ज्यांना अहंकार होता त्यांना २०१४ मध्ये धडा शिकवला, असा टोलाही फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.
आम्ही २०-२० ची मॅच सुरु केली आहे, २०२४ ला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मॅच जिंकणार. आता फक्त जनतेसाठी काम करायचं, मला काय मिळेल याचा विचार करायचा नाही, असा महत्त्वाचा सल्लाही फडणवीसांनी भाजप नेते-पदाधिकाऱ्यांना दिला. मात्र जे मला जेलमध्ये पाठवण्याचे प्रयत्न करत होते, तेच तुरुंगात गेले. मी यांच्या बापालाही घाबरत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी खडसावून सांगितलं.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.