BJP Politics: भाजप प्रदेशाध्यक्षांची राजकीय विषयावर भाष्य न करण्याची मंत्र्यांना ताकीद; म्हणाले, 'फक्त देवेंद्र फडवणवीस...'

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील पदाधिकारी आणि मंत्र्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत.
BJP Politics
BJP PoliticsSaam tv

सुशांत सावंत

Chandrashekhar Bawankule News : भाजपची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक कालपासून नाशिक याठिकाणी सुरू आहे. या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील पदाधिकारी आणि मंत्र्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

'मंत्र्यानी फक्त स्वतःच्या विभागाशी संबंधित विषयांवरच बोलावे. राजकीय विषयांवर मंत्र्यांनी भाष्य करू नये. राजकीय विषयांवर फक्त देवेंद्र फडणवीस बोलतील, अशा सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या आहेत. (Latest Marathi News)

भाजपची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. या भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप मंत्री, प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांना वाद टाळण्यासाठी महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप मंत्री, प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे की, 'माध्यमांशी आणि सोशल मीडियावर वादग्रस्त विषयांवर बोलणे टाळा. पक्षाने दिलेल्या विषयावरच माध्यमांशी बोला'. वादग्रस्त विधान करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सूचना केल्या आहेत.

BJP Politics
Sharad Pawar : अजित पवारांना मुख्यमंत्री करणार का? शरद पवार स्पष्टच बोलले...

तसेच बावनकुळे यांनी भाजप मंत्र्यांना देखील सूचना केल्या आहेत. 'मंत्र्यांनी फक्त स्वत:च्या विभागाशी संबंधित विषयांवरच बोलावे. राजकीय विषयांवर मंत्र्यांनी भाष्य करू नये. राजकीय विषयांवर फक्त देवेंद्र फडणवीस बोलतील. प्रवक्त्यांनी वायफळ विषयांवर बोलू नये, अशा सूचना बावनकुळे यांनी केल्या आहेत.

दरम्यान, भाजपची (BJP) दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा आज, शनिवारी दुसरा दिवस आहे. विधानसभेसाठी भाजप आणि शिंदे गट मिळून मिशन 200 लक्ष ठेवले आहे. लोकसभेसाठी राज्यात भाजपचे मिशन 45 चे टार्गेट असतानाच आता विधान सभेसाठी देखील भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. याच मिशन 200 साठी भाजप शिंदे-फडणवीस सरकारने केलेली कामे जनतेपर्यत पोहोचवणार आहे.

BJP Politics
Ajit Pawar : राज्यात महत्त्वाच्या लोकांवर हल्ले होतायत, सरकार आणि पोलीस काय झोपा काढताहेत? अजित पवार संतापले

भाजपने आगामी निवडणुकीसाठी 'महाविजय २०२४' म्हणून संकल्पाची घोषणा केली आहे . तर भाजपकडून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी घोषणा केली आहे. आमदार श्रीकांत भारतीय निवडणूक इन्चार्ज म्हणून काम पाहणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ही घोषणा केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com