Ajit Pawar : राज्यात महत्त्वाच्या लोकांवर हल्ले होतायत, सरकार आणि पोलीस काय झोपा काढताहेत? अजित पवार संतापले

महत्तवाच्या लोकांच्याबाबत अशा घटना घडायला लागल्या, तर सर्वसामान्य माणासांनी कुणाकडे बघावं?
Ajit Pawar
Ajit PawarSaam tv

Ajit Pawar Aurangabad Visit : रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लबोल करण्यात येत आहे. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar
Bigg Boss 16: 'बिग बॉस १६'च्या घरात रंगणार 'खतरों के खिलाडी', कोणाला लागणार रोहितचा जॅकपॉट...

राज्यातील महत्वाच्या लोकांवर हल्ले होत असताना सरकार आणि पोलीस यंत्रणा काय झोपा काढत आहे का? अशी टीका करत अजित पवारांनी संताप व्यक्त केला. आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करण्यात आला. कोकणातील एक पत्रकाराला संपवले, तो अपघात झाल्याच दाखवलं. यामागे कोण आहे, कोण मास्टरमाईंड आहे हे कळलं पाहिजे. पोलीस (police) झोपा काढतायत का? सर्वसामान्यांनी कुणाकडे बघावं? कायदा सुव्यवस्था कशी अबाधित राहील, त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात यावर आम्ही आवाज उठवणार असल्याच अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

महत्तवाच्या लोकांच्याबाबत अशा घटना घडायला लागल्या, तर सर्वसामान्य माणासांनी कुणाकडे बघावं? कायदा, सुव्यवस्था कशी या राज्यात राहणार? या घटनेचा तपास झालाच पाहिजे यासाठी अर्थसंकल्प अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
Pune News: दहावी-बारावी परीक्षेच्या कामांवर बहिष्कार?; प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून संपाचा इशारा

पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेची बंडखोरी करण्यामागचा सूत्रधार कोणी तिसराच दिसतोय, मतांचे विभाजन करण्यासाठी हे केल्याचं दिसतंय. याचा फायदा इतर पक्षांना व्हावा यासाठी कोणीतरी हे केलं असावं. पण कोणी जर हे केलं असेल तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या मतदारांना आवाहन करतील की, नाना काटे हे महाविकास आघाडीचा उमेदवार आहेत आणि त्यांनाच मतदान करावं असं ते सांगतील.

संजय राऊत यांच्याकडे काय माहिती आहे हे मला माहित नाही. पण कुणाला कोणी धमकावत असेल आणि सातत्याने अशा घटना घडतायत तर हे सरकारचे अपयश आहे. महाविकास आघाडीतले नेते काही बोलले तर आम्ही बैठकीत बोलू. महाविकास आघाडीला कोणती अडचण येईल असं वक्तव्य मी करणार नाही असे देखील अजित पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com