Pune News: दहावी-बारावी परीक्षेच्या कामांवर बहिष्कार?; प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून संपाचा इशारा

याचा थेट परिणाम परीक्षेच्या कामकाजावर आणि विद्यार्थ्यांवर होऊ शकतो.
Pune News
Pune NewsSaam TV
Published On

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Pune Education News: गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय. मागण्या पूर्ण न केल्यास दहावी-बारावी परीक्षांच्या कामावर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. (Latest Pune Education News)

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचं जाहीर केलं आहे. याचा थेट परिणाम परीक्षेच्या कामकाजावर आणि विद्यार्थ्यांवर होऊ शकतो.

Pune News
Kokan Teachers Constituency Election : पनवेलला गाेंधळ; कर्मचारी सांगत हाेता कसे करायचे मतदान, कार्यकर्त्यांनी दाखविला इंगा

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास परीक्षा काळात अनिश्चित काळासाठी संप पुकारण्यात येईल असा इशारा देखील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाने प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यात १३ फेब्रुवारीला मोर्चा काढला जाईल असं म्हटलं आहे. सोमवारी शनिवारवाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणारआहे.

Pune News
Pune Illegal School : पुण्यात मोठी कारवाई, ३० अनधिकृत शाळा थेट बंद, १३ शाळा बेकायदेशीरपणे सुरुच

महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,साल २००५ पासून राज्यातील शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे. त्यामुळे आता शाळांमध्ये बोटावर मोजण्याइतके शिक्षकेतर कर्मचारी राहिले आहेत. अशा परिस्थितीत शाळांमधील रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने तत्काळ निर्णय प्रसिद्ध करण्याची आवश्यकता आहे. मात्र वारंवार मागणी आणि पत्र व्यवहार करूनही सरकार कोणताच निर्णय घेत नाही. त्यामुळे आत शिक्षकेतर संघटनांमार्फत मोर्चा काढला जाणार असा ईशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com