Karjat Crime News: अहमदनगर येथील संशयास्पद घटना! दोन मित्रांनी मिळून जिवलग मित्राचा केला खून

कर्जत पोलिस स्टेशनमध्ये महेश अंकुश पोटरे राहणार पिंपळवाडी यांच्या फिर्यादीवरून दोघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर येथील संशयास्पद घटना! दोन मित्रांनी मिळून जिवलग मित्राचा केला खून
अहमदनगर येथील संशयास्पद घटना! दोन मित्रांनी मिळून जिवलग मित्राचा केला खूनसचिन आगरवाल

सचिन आगरवाल

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथील नितीन अंकुश पोटरे वय 35 वर्ष, या युवकाचा त्याचे दोन मित्र आनंद बबन पर हर व जावेद अरबाज शेख राहणार पिंपळवाडी यांनी कुकडी कालव्याच्या पाण्यामध्ये बुडवून निर्घुणपणे खून करण्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये महेश अंकुश पोटरे राहणार पिंपळवाडी यांच्या फिर्यादीवरून दोघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ahmednagar Crime)

याबाबत महेश अंकुष पोटरे यांनी दिलेल्या फिर्यादीत मध्ये म्हटले आहे की, 23 जानेवारी या सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नितीन पोटरे घरांमधून मी आनंद परहर, व जावेद शेख या दोन मित्रांकडे जाऊन येतो असे म्हणून घराच्या बाहेर पडला, मात्र तो घरी परत आलाच नाही, रात्री उशिरा घरातील नातेवाईक मयत नितीन यास फोन करत होते परंतु त्याचा फोनही लागत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी संजय पोटरे व इतर नातेवाईकांनी नितीन याचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही.

अहमदनगर येथील संशयास्पद घटना! दोन मित्रांनी मिळून जिवलग मित्राचा केला खून
Happy Birthday Shreyas Talpade: श्रेयसबद्दलच्या अशा काही गोष्टी ज्या फॅन्सला अजून माहितीच नाहीत!

दरम्यान जावेद शेख यांनी नितीन याची मोटरसायकल घरी आणून लावली व सांगितले की, मी नितीन व आनंद हे तिघेजण रात्री बरोबरच होतो, आम्ही तिघेही दारू पिलो होतो मात्र मी नितीन ची गाडी घेऊन पुढे आलो असून खूप दारू पिला असल्यामुळे तो आनंद परहर याच्यासोबत होता मला काही माहिती नाही.

यानंतर याप्रकरणी आनंद परहर यास विचारणा केली असता त्याने सांगितले की रात्री नऊ वाजता मी नितीन यास जावेद शेख यांच्या घराजवळ सोडले आहे . तिथून पुढे तो कुठे गेला मला माहिती नाही. यानंतर नातेवाइकांनी नितीन आनंद परहर व जावेद शेख यांच्यासोबत गेला होता तो घरी परत आला नाही अशी तक्रार पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली होती.

हे देखील पहा-

दरम्यान २५ जानेवारी या दिवशी सकाळी सात वाजता तळवडी शिवारामध्ये येसवडी कुकडी कॅनॉल मधील पाण्यामध्ये नितीन पोटरे यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे खराब झाला होता. यानंतर मृतदेहाची ओळख पटली आणि परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे . या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुनाचे गुढ कायम

दरम्यान मयत नितीन, व आनंद आणि जावेद हे तिघे चांगले मित्र होते. ती गाणी या घटनेच्या आधी एकत्रित दारू पिलेली होती. मग असे असताना नितीन याचा खून निर्दयपणे या दोन मित्रांनी का केला याबाबत गुढ कायम आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com