Suresh Dhas on Walmik Karad : गँग्स ऑफ परळीमुळे पुण्याचं नाव खराब होईल; संतोष देशमुख प्रकरणावरून सुरेश धस यांचा आक्रोश

Suresh Dhas News : संतोष देशमुख प्रकरणावरून सुरेश धस यांनी पुण्यात आक्रोश केला. गँग्स ऑफ परळी म्हणत सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींवर निशाणा साधला. ते पुण्यात बोलत होते.
Suresh Dhas news update
suresh dhas newsSaam tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, यामागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात मोर्चा काढले जात आहेत. पुण्यातही मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे तोफ डागली. वालूकाका आणि गँग्स ऑफ परळीमुळे पुण्याच नाव खराब होईल, अशा शब्दात सुरेस धस यांनी टीकेचे बाण सोडले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पुण्यात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातील या आक्रोश मोर्चामध्ये बीडमधील प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती. या मोर्चामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगवर तोफ डागली.

Suresh Dhas news update
Prajakta Mali - Suresh Dhas: कुणाचंही मन दुखावलं असेल तर...; प्राजक्ता माळीबद्दलच्या वक्तव्यावर सुरेश धस यांची दिलगिरी

सुरेश धस म्हणाले, 'माझा आवाज हळूहळू वाढतो. माझा टॉप गेअर पडत नाही. पुण्यातील आमदारांना रविवारची सुट्टी असल्याने येथे यायला सवड मिळाली नसेल. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाबतीत न्याय झाला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना दहा कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. आम्ही संतोष देशमुख यांच्या बाबतीत मागण्या केल्या, त्या सगळ्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्या आहेत. एसआयटीमध्ये वालूकाकाचे सामील आहेत'.

Suresh Dhas news update
Suresh Dhas : बिनभाड्याच्या खोलीत बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; आमदार सुरेश धस बीडमध्ये कडाडले, रोख कुणाकडे? VIDEO

'मी याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. उज्जवल निकम यांनी काम पाहावं, अशी विनंती केली आहे. पुणेभूमी ही पावनभूमी आहे. पुणे तिथे काय उणे, असं म्हटलं जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुण्यात झाला. बीडमध्ये संघटित टोळी निर्माण करण्याचं काम वालूबाबाने केली. त्याला त्याच्या आकाचा आशीर्वाद होता. या लेकरा बाळांचे छत्र हरवून घेतलं आहे. तो आका असो किंवा आकांपेक्षा मोठा त्यांना फाशी झालीच पाहिजे, असे धस पुढे म्हणाले.

Suresh Dhas news update
Dhananay Munde : पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार ; धनंजय मुंडेंचं सुचक वक्तव्य

'संतोष देशमुख प्रकरणामुळे सगळे आरोपी पुण्यात अटक झाले. वालूकाका अँड गॅंग गँग्स ऑफ परळीमुळे पुण्याचं नाव खराब होईल. जिथे जिथे पुण्यात फ्लॅट्स असतील, पुण्यातील जनतेला विनंती करतो. त्यांची प्रॉपर्टी दिसेल, फक्त कळवा. वालूकाका येथे आला, त्याचे शंभर बँक खाते सापडले आहेत. ज्यांचे बँक खाते आहेत, त्यांची ईडीकडून चौकशी करा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.

'मी २५-२५ वर्ष झालं, आम्ही राजकारणात आहोत. पुण्यात बळच एक फ्लॅट रडत पडत घेतला आहे. मी एप्रिल महिन्यापासून संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट हे रचत होते, असेही सुरेश धस यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com