Supriya Sule
Supriya SuleSaam tv

Supriya Sule: अतिवृष्टीचा फटका, MPSC परीक्षा पुढे ढकला, सुप्रिया सुळेंची मागणी

Supriya Sule On MPSC Exam: राज्यात सध्या पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.
Published on

राज्यात सध्या मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती झाली आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे नुकसान झाले आहे. सोलापूर, धाराशिवमध्ये पुराच्या पाण्यात हजारो नागरिक अडकले आहेत.यामुळे मुलांना शाळेत देखील जाता येत नाहीये. मागील दोन आठवड्यांपासून बीड, धाराशीवमधील शाळा बंद आहेत. अशातच आता एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे यांनी आयोगाला विनंतीदेखील केली आहे

Supriya Sule
Supriya Sule : सर्व आनंद हिरावून घेतला ताई, आता काय उपयोग…; निकालानंतर वैभवी देशमुखला सुप्रिया सुळेंचा फोन, म्हणाल्या...

MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलावी, सुप्रिया सुळेंची मागणी (Supriya Sule Demand For MPSC Exam Postponed)

पुराचा अडथळा, पावसाचे सावट यामुळे एम पी एस सी ची परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. येत्या २८ सप्टेंबर रोजी राज्य सेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. परीक्षा तोंडावर असतानाच राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याचा बाबत सुप्रिया सुळे यांची सुद्धा आयोगाला विनंती केली आहे.सद्यस्थितीत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचणे शक्य होईल अशी शक्यता नाही. त्यामुळे ही परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलावी, सुप्रिया सुळे यांची सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

Supriya Sule
Supriya Sule: 'साधी राहणी अन् उच्च विचारसरणी' असणाऱ्या सुप्रिया सुळेंचे साडीतील फोटो पाहा

आयोगाने ३८५ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर याची परीक्षा २८ सप्टेंबर रोजी नियोजित केली आहे.पुरामुळे मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांचे अभ्यास साहित्याचे नुकसान झाल्याचे म्हणणे आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे अवघड झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.मराठवाड्यासह विदर्भातील विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनीदेखील आयोगाला विनंती केली आहे.

Supriya Sule
चिकन खाल्लं, बेसीन धुण्यावरून राडा; MPSC करणाऱ्या मुलींची हाणामारी, ४ जणींनी रूम पार्टनरला भींतीवर आदळून चोपलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com