University Exam Fee Hike: विद्यार्थ्यांवर खर्चाचा भार; विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात २०टक्क्यांनी वाढ

Pune University Hikes Exam Fees : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतलाय. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व परीक्षा मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत हा शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आलाय.
Pune University Hikes Exam Fees
Savitribai Phule Pune University increases exam fees by 20%, students express concern.saam tv
Published On
Summary
  • पुणे विद्यापीठाने परीक्षा शुल्कात २० टक्के वाढ केली आहे.

  • निर्णय व्यवस्थापन परिषद आणि परीक्षा मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय.

  • अहिल्यानगर ,नाशिक व पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये परीक्षा होणार.

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षा शुल्कात २० टक्क्यांनी वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतलाय.एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासाडी झालीय. दुसरीकडे विद्यापीठाने विद्यार्थ्यांवर खर्चाचा भार वाढवलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत परीक्षा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

Pune University Hikes Exam Fees
Pune News: कॅन्टीनच्या जेवणात आढळल्या अळ्या; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील धक्कादायक प्रकार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अहिल्यानगर ,नाशिक व पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. विद्यापीठाने त्यासाठी परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.मात्र,परीक्षा शुल्कात २० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षा शुल्काचा वाढीव भार पडला आहे. याबाबत विद्यापीठातर्फे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Pune University Hikes Exam Fees
Vanshawal: जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वंशावळ हवी? पण वंशावळ म्हणजे काय अन् कशी काढायची?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत २०१८ ते २०२० मध्ये 15 टक्के शुल्क वाढ करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र कोरोना काळात शुल्कवाढ करणे संयुक्तिक नसल्याने विद्यापीठाकडून शुल्क वाढ करण्याता निर्णय मागे घेण्यात आला होता.

सुमारे सात वर्षांपासून विद्यापीठाने परीक्षा शुल्कात वाढ केली नव्हती. परंतु २०२३-२४ व २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे परीक्षा पद्धतीत व परीक्षा घेण्याच्या विषयांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. मागील काही वर्षांचा विचार करता विद्यापीठाकडून ५५ टक्के शुल्क वाढ करणे क्रमप्राप्त होते. मात्र विद्यापीठाने २०टक्के शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीव परीक्षा शुल्काचा तपशील परिपत्रकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com