Pune News: कॅन्टीनच्या जेवणात आढळल्या अळ्या; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील धक्कादायक प्रकार

Savitribai Phule Pune University: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील जेवणात अळ्या आढळल्याचा प्रकार उघडकीस आलाय. यामुळे विद्यार्थी संतप्त झाले असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत.
worms in food
Worms found in a student's meal at Savitribai Phule Pune University canteen Saam tv
Published On

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

कधी ढेकूण, तर कधी उंदीर तरी कधी निकृष्ट जेवण. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत राहत असते. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जेवणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विद्यापीठातील कॅन्टीनच्या जेवणात अळ्या आढळून आल्याने विद्यापीठ पुन्हा चर्चेत आले आहे. (Worms Found In Food At Savitribai Phule Pune University)

हा प्रकार २२ जुलै रोजी उघडकीस आला होता. जेवणात अळ्या सापडण्याचे प्रकार वारंवार घडत असून विद्यापीठ प्रशासन याकडे दुर्लक्ष करते, असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. जेवणात अळ्या आढळून आल्याचा फोटो विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. निकृष्ट पद्धतीचे जेवण मिळत असल्यानं विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केलीय.

काही दिवासापूर्वी विद्यापीठाच्या वस्तीगृहात उंदरांचा आणि ढेकणांचा सुळसुळाट असल्याचं समोर आलं आलं होतं. आता पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठ भोजन व्यवस्था आणि स्वच्छतेच्या कारणामुळे चर्चेत आले आहे. दरम्यान या घटनेमुळे विद्यापीठ प्रशासनाची जबाबदारी यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी माध्यामांना दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या रिफेक्ट्रीत विद्यापीठाने मान्य केलेल्या दरात जेवण दिलं जातं. त्यामुळे शेकडो विद्यार्थी मासिक पास काढून रिफेक्ट्रीत जेवण करतात. कंत्राटी पद्धतीने रिफेक्ट्री चालवली जातेय. मात्र कंत्राटदाराकडून जेवणाबाबत कोणतीच काळजी घेतली जात नसल्याचं दिसत आहे. कारण विद्यार्थ्यांच्या जेवणात झुरळ, अळी निघण्याचे प्रकार वांरवार होताना दिसत आहेत. तरी विद्यापीठ प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. मेसमध्ये स्वच्छते बाबतीत हलगर्जीपणा नसावा.

worms in food
पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ, नवऱ्याने गळफास घेत आयुष्याचा दोर कापला, बायकोचाही संशयास्पद मृत्यू

ज्या विद्यार्थ्याच्या जेवणात अळी आढळून आली त्या विद्यार्थ्याने प्रशासनावर नाराजी व्यक्त केलीय. प्रथम वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, ” मंगळवारी रात्री रिफेक्ट्रीमध्ये कोबीची भाजी खाताना त्यात एक मोठी अळी आढळली. पण आम्ही नेमकी दाद कोणाकडे मागायची, हा प्रश्न आम्हाला पडला. कारण असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत, पण कोणीही लक्ष देत नाही.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com