पतीची आत्महत्या, पत्नीचा संशयास्पद मृत्यू; पोलिस तपास सुरू
चारित्र्यावर संशयातून खून आणि आत्महत्येचा संशय
दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात
सांगवी पोलिस स्टेशन हद्दीत शिवनेरी नगरात घटना
गोपाल मोटगरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
Pimpri Chinchwad husband commits suicide after suspected murder of wife : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली तर पत्नीचा मृतदेह घरात संशयास्पदरित्या आढळला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवले आहेत.
सांगवी पोलीस स्टेशन हद्दीतील शिवनेरी नगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. श्याम जंगू वाघेला वय 56 वर्ष असं आत्महत्या केलेल्या विवाहित पुरुषाचे नाव आहे. तर राजश्री शाम वाघेला वय 48 वर्ष अस संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. श्याम आणि राजश्री वाघेला हे पती पत्नी आहेत. श्याम याने राजश्रीच्या चारित्र्यसंश्यावरून तिचा खून करून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात सध्या सांगवी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.
सांगवीमधील शिवनेरीमधील नवरा बायगोच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. श्याम यानेच पत्नीला आधी मारले असेल, त्यानंतर त्यानेही गळफास घेऊन आय़ुष्य संपवलं असू शकतं, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी वाघेला यांच्याबद्दल आजूबाजूला चौकशी केली असता दोघांमध्ये खटके उडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. श्याम पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता, त्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणेही होत होती. त्यामधून श्याम याने पत्नीचा खून केला असेल, त्यानंतर गळफास घेत आयुष्याचा दोर कापला असेल, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.