sunetra pawar
Union Home Minister Amit Shah meets Maharashtra Deputy Chief Minister Sunetra Pawar in New DelhiSaam Tv

पवार कुटुंब दिल्लीत, विलिनीकरणाला वेग? सुनेत्रा पवारांनी घेतली मोदी-शाहांची भेट

sunetra pawar : अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकऱणाच्या चर्चेनं जोर धरलाय.. मात्र यात आता नवा ट्विस्ट आलाय... विलिनीकरणाच्या चर्चेला वेग आलाय... त्याचं नेमकं कारण काय? आणि दिल्लीत नेमकं काय घडलं? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
Published on

अजित पवारांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली..आणि दुःख विसरुन राजकारणात सक्रीयही झाल्या... मात्र दादांच्या मृत्यूनंतर एक विषय कायम चर्चेत राहिलाय तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण.....आता याच विलिनीकरणाच्या चर्चेला वेग आलाय..आणि त्याला कारण ठरलंय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंनी गाठलेली दिल्ली....

हा फोटो नीट पाहा... उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवारांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतलीय... याच भेटीत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय...

या भेटीत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तसंच राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर पार्थ पवारांना पाठवण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे..या भेटीत पंतप्रधान मोदी आणि शाहांनी उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांच्या पाठीशी ठाम उभे राहू, असा विश्वास दिल्याचीही माहिती सुत्रांनी दिलीय..

मोदी-शाहांच्या भेटीदरम्यान उपस्थित असलेल्या दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मात्र विलिनीकरणाबाबत वेगळी भूमिका मांडली.

एका बाजूला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांनी अजितदादा हयात असताना विलिनीकरणाला ग्रीन सिग्नल दिल्याचा दावा पवारांच्या राष्ट्रवादीकडून केला जातोय.... तर रोहित पवार दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन विलिनीकरणाबाबत पुरावेच सादर करणार आहेत.... त्यामुळे दादांची शेवटची इच्छा पूर्ण कऱण्यासाठी मोदी शाहांच्या भेटीनंतर सुनेत्रा पवार विलिनीकरणाचा निर्णय घेणार की दादांनी मांडलेली वेगळी चूल कायम ठेवणार... याकडे देशाचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com