Adv Suraj More : कोकणातल्या लेकाची अभिमानस्पद कामगिरी! सूरज मोरेची जिल्हा न्यायाधीशपदी निवड

Ratnagiri Adv Suraj More Success Story : रत्नागिरीतील ॲड. सूरज सदानंद मोरे यांची १६ वर्षांच्या वकिली अनुभवानंतर जिल्हा न्यायाधीशपदी निवड. रत्नागिरी बारमधून या पदावर पोहोचणारे पहिलेच वकील. कोकणाचा अभिमान वाढवला आहे.
Adv Suraj More : कोकणातल्या लेकाची अभिमानस्पद कामगिरी! सूरज मोरेची जिल्हा न्यायाधीशपदी निवड
Ratnagiri NewsSaam Tv
Published On
Summary
  • १६ वर्षांच्या प्रयत्नानंतर कोकणातील तरुणाची जिल्हा न्यायाधीशपदी निवड

  • रत्नागिरी बारमधून या पदावर पोहोचणारे पहिले वकील

  • मुंबई उच्च न्यायालयाच्या कठोर परीक्षांमध्ये यशस्वी

  • कोकणाचा मान वाढवणारी प्रेरणादायी कामगिरी

अमोल कलये, रत्नागिरी

कोकणच्या जिलाने मोठी बाजी मारली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ॲड.श्री.सूरज सदानंद मोरे या तरुणाची जिल्हा न्यायाधीश पदी निवड झाली आहे. गेले १६ वर्ष सुरु असलेल्या त्यांच्या कष्टाला अखेर यश प्राप्त झाले आहे. रत्नागिरी बार असोसिएशन या वकिलांच्या बारमधून जिल्हा न्यायाधीश म्हणून निवडून येणारे ते पहिलेच वकील असल्याचं म्हटलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ॲड.श्री.सूरज सदानंद मोरे हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील पुनस गावचे सुपुत्र आहेत. गेली १६ वर्षे जिल्हा न्यायालय रत्नागिरी येथे यशस्वीरित्या वकिली व्यवसाय करणारे ॲड.श्री.सूरज सदानंद मोरे यांची जिल्हा न्यायाधीश या पदी निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी बार असोसिएशन या वकिलांच्या बारमधून जिल्हा न्यायाधीश म्हणून निवडून येणारे ते पहिलेच वकील आहेत.

Adv Suraj More : कोकणातल्या लेकाची अभिमानस्पद कामगिरी! सूरज मोरेची जिल्हा न्यायाधीशपदी निवड
Education Department Scam : शिक्षण विभागात खळबळ! तब्बल १ लाखांची लाच घेताना बड्या अधिकार्‍याला रंगहाथ पकडले

मुंबई उच्च न्यायालयातर्फे दरवर्षी जिल्हा न्यायाधीश या पदासाठी परीक्षा घेतली जाते. सदरची निवड ही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत याद्वारे केली जाते. साधारण या निवड प्रक्रियेला एक वर्ष इतका कालावधी लागतो. तसेच मुख्य परीक्षेचे दोन म्हणजे दिवाणी व फौजदारी हे पेपर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तपासत असून मुलाखत देखील ते स्वतः घेतात. या तिन्ही परीक्षांमधून मार्गक्रमण करून ॲड. मोरे यांनी या पदाला गवसणी घातली आहे.

Adv Suraj More : कोकणातल्या लेकाची अभिमानस्पद कामगिरी! सूरज मोरेची जिल्हा न्यायाधीशपदी निवड
Shocking : हृदयद्रावक! वडिलांची नजर चुकवून ४ वर्षाचा शिवराज ट्रॅक्टरवर चढला, अचानक गिअर पडला अन् थेट...

गेली १६ वर्षे त्यांचा दिवाणी व फौजदारी खटले चालवण्यामध्ये हातखंडा असून खूप कमी कालावधीमध्ये त्यांनी उत्तम प्रकारे कामे चालवून गरजूंना न्याय मिळवून दिला आहे. आता ते जिल्हा न्यायाधीश म्हणून अत्यंत पवित्र समजले जाणारे न्यायदानाचे काम करणार आहेत. ऍड. सोनाली खेडेकर मोरे यांचे ते पती आहेत. त्याही न्यायाधिशा पदाची परीक्षा देत असून केवळ २ मार्कांनी त्याची संधी हुकली. पण त्या ही आता जोमाने अभ्यासाच्या तयारीला लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com