We Want Teachers: जिल्हा परिषदेवर 350 विद्यार्थ्यांचा ठिय्या, CEO च्या आश्वानानंतर चेहरे खूलले

आजच्या विद्यार्थ्यांच्या आंदाेलनास पालकांनी देखील पाठींबा दिला.
Buldhana News, Zilla Parishad School, Students, School
Buldhana News, Zilla Parishad School, Students, Schoolsaam tv

Buldhana News : शिक्षकांच्या मागणीसाठी बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद हायस्कूल मधील साडेतीनशे विद्यार्थ्यांनी आज (बुधवार) जिल्हा परिषद कार्यालयात आंदाेलन छेडले. यामुळे आज जिल्हा परिषद कार्यालय परिसरातच शाळा भरल्याचे चित्र हाेते. (Maharashtra News)

Buldhana News, Zilla Parishad School, Students, School
Congress आमदारासह 52 जणांवर गुन्हा दाखल, Sambhaji Bhide यांच्या अटकेसाठी छेडलं हाेतं आंदाेलन

बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये शिक्षकांची निम्मे पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे (students) शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर इतरही भौतिक सुविधा देखील नाहीत.

Buldhana News, Zilla Parishad School, Students, School
BJP Pappu Chavan Case : माझे राजकीय अस्तित्व त्यांना खूपतयं... शिवसेना आमदाराने खूनाची सुपारी दिल्याचा आराेप, दाेघे अटकेत

त्यामुळे आज विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. तब्बल साडेतीनशे विद्यार्थ्यांनी आज जिल्हा परिषद कार्यालय परिसरात शाळा भरवली. विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायिले. दरम्यान या आंदाेलन काळात एका विद्यार्थिनीला चक्कर आली.

Buldhana News, Zilla Parishad School, Students, School
Karjat Jamkhed MIDC : आमदार राेहित पवारांचा ड्रीम प्राेजेक्ट ग्रामसभेने नाकारला

संबंधित विद्यार्थिनीला घेत तिच्या पालकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन गाठले. दरम्यान आंदाेलन काळात अधिकारी भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांकडे आले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात थेट प्रवेश केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी (buldhana) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर विद्यार्थ्यांना सर्व मागण्या मंजूर केल्या जातील असे आश्वासन दिले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com