Manmad News : गणेशभक्तांचा कुत्र्यांनी घेतला चावा, लहान मुले जखमी; रुग्णालयात दाखल

या घटनेतील जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
stray dogs
stray dogssaam Tv

- अजय सोनवणे

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे आंबेडकर नगर, सिकंदर नगर परिसरात माेकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गणेशाेत्सव मंडळांच्या मंडपापुढील भाविकांचा कुत्र्यांनी चावा घेतला. (Maharashtra News)

stray dogs
Ganeshotsav 2023 : पाेलीस असल्याची बतावणी करुन सोन्याच्या लॉकेटसह रोख रक्कम लुटली

राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. मनमाड येथे देखील लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविक घराबाहेर पडू लागले आहेत. बहुतांश ठिकाणी गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी हाेऊ लागली आहे.

stray dogs
MSRTC News : चालकाने दारु ढोसल्याने कंडक्टरने घेतला स्टेअरिंगचा ताबा, पुढचा 60 किलाेमीटरचा प्रवास झाला सुखकर

मनमाड येथील आंबेडकर नगर, सिकंदर नगर परिसरात कुत्र्यांनी उच्छाद मांडला. गणेशाेत्सव मंडळाच्या मंडपापुढे उभ्या असलेल्या नागरिकांवर हल्ला चढवीत आठ ते नऊ जणांना चावा घेतला. या जखमींमध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे.

शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यांवरून फिरत असल्याने नागरिकांना रस्त्याने चालणे मुश्किल झाले आहे. पालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

stray dogs
Pandharpur News : करमाळा भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचा-यास 2500 रुपये घेताना एसीबीने पकडले

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com