ST Bus News : भाडेवाढ नाही, तरीही 'लालपरी' कमाईत सुस्साट; दिवसाला ६० लाख प्रवासी, या महिन्यात ३१ कोटींची धाव!

ST Bus Income : दिवाळीच्या दिवसात लालपरीने चांगली कमाई केली. मागील महिन्यात एसटी विभागाने ९०० कोटींहून अधिक कमाई केली. या कमाईने लालपरीने सुसाट वेग पकडला आहे. यामुळे सरकारलाही मोठा दिलासा मिळाला आहे.
ST Bus News
ST Bus Google
Published On

रुपाली बडवे, साम टीव्ही

मुंबई : नोव्हेंबर महिन्यातील दिवाळी सणामुळे प्रवाशांचा चढ-उतार वाढल्याचा दिसून आला. यामुळे तब्बल ९४१ कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला मिळाले. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक झाली. यामुळे सुमारे ३१.३६ कोटी रुपये उत्पन्न दिवसाला प्राप्त केले आहे. मागील वर्षाच्या याच काळातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे २६ कोटी रुपयांनी जास्त आहे.

मागील वर्षी दिवाळीच्या काळात १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. यंदा ही भाडेवाढ नसताना देखील वाढलेले विक्रमी उत्पन्न एसटीवर सर्वसामान्य प्रवाशांनी दाखवलेले विश्वासाचे द्योतक आहे, असे प्रतिपादन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी केले आहे.

ST Bus News
Maharashtra Politics : भाजप प्रदेशाध्यक्षांनी रामदास आठवलेंची मागितली माफी; नेमकी काय चूक झाली?

एसटीचे प्रवासी उत्पन्न जरी वाढलेले असले तरी, त्याप्रमाणामध्ये एसटीचा खर्च देखील वाढला आहे. गेल्या काही महिन्यात इंधनाचे वाढते दर, कर्मचाऱ्यांची वेतन वाढ, टायर व सुट्ट्या भागांच्या दरामध्ये वाढ झाली होती. याचाही प्रतिकूल परिणाम एसटीचा खर्च वाढीवर झालेला आहे. त्यामुळे संचित तोटा 11 हजार कोटीपर्यंत पोहोचला आहे.

ST Bus News
Maharashtra Politcs : निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याने हाती धरली उद्धव ठाकरेंची मशाल

या नोव्हेंबर महिन्यात नियमित खर्चाबरोबरच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिल्यामुळे सुमारे 52 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा एसटीच्या तिजोरीवर पडला आहे. याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची हजारो कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. या सर्वांचा विचार करुन नाईलाजास्तव उत्पन्न आणि खर्चातील ताळमेळ राखण्यासाठी एसटीने तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. तसा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे.

ST Bus News
Politcal News : देवेंद्र फडणवीसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं, शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com