

धुळ्यात गॅस सिलिंडर तुटवड्यामुळे नागरिकांचा राडा
गॅस एजन्सीबाहेर एसआरपीएफ जवानाला मारहाण
गॅस टंचाईमुळे धुळ्यात तणावपूर्ण परिस्थिती
पोलिस बंदोबस्तात गॅस सिलिंडरचे वितरण सुरू
धुळे शहरामध्ये गॅस टंचाईचा भडका उडाला आहे. एका गॅस एजन्सीबाहेर चक्क एसआरपीएफ जवान आणि नागरिकांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी नागरिकांनी जवानाला गंभीर मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या घटनेनंतर गॅस एजन्सीवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांच्या पाहाऱ्यात गॅस वितरण करण्यात येत आहे.
धुळे शहरातील गॅस एजन्सीबाहेर घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. बुकिंग करुनही गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. गॅस एजन्सीबाहेर मोठी रांग लागली आहे. या गॅस एजन्सीबाहेर एसआरपीएफ जवान आणि नागरिकांमध्ये तुफान राडा झाला. शाब्दिक बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. नागरिकांनी एशआरपीएफ जवानाला बेदम मारहाण केली. या घटनेमुळे गॅस एजन्सीबाहेर गोंधळाचे वातावरण आहे.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता सर्वसामान्यांना भोगावे लागत असल्याचे दिसून येत आहे. गॅस एजन्सीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात राडा होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. धुळ्यामध्ये गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे झालेल्या राड्यादरम्यान जवानाला मारहाण करण्यात आल्यामुळे गॅस एजन्सीबाहेर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या पोलिस बंदोबस्तामध्ये गॅस एजन्सीमध्ये सिलिंडरचे वितरण करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.