नांदेडमध्ये भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक, ४ जण जागीच ठार

nanded accident : नांदेडमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव कारने दुचाकीला धडक दिली आहे. या धडकेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
Nanded news
nanded accident Saam tv
Published On
Summary

नांदेडमध्ये भीषण अपघाताचा थरार

हडसनी फाट्याजवळील अपघातात ४ जणांचा मृत्यू

४ जणांच्या मृत्यूने नरवाडे कुटुंबाला धक्का

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

राज्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे विविध जिल्ह्यात रस्त्यावर वाहनांची येजा वाढली आहे. या वाहतुकीदरम्यान अपघातही वाढले आहेत. नांदेडमध्येही भीषण अपघाताची घटना घडली आहे. नांदेडच्या हडसनी फाट्याजवळ बुधवारी रात्री भरधाव कारने दोन दुचाकीला धडक दिली. या अपघातात चार जणांचा जागीच अपघाती मृत्यू झाला आहे.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील हडसनी फाट्याजवळ बुधवारी रात्री दहा वाजता ही दुर्घटना घडली. दोन दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झालेत. अपघातात दुचाकीवरील आई, मुलगा आणि आत्या असे तिघे जण ठार झाले. तर दुसऱ्या कुटुंबातील एक जण ठार झाला. या अपघाताने हडसनी फाट्याजवळ एकच खळबळ उडाली.

Nanded news
भयकंर! दोन भरधाव कारची समोरसमोर धडक; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

अपघात नेमका कसा घडला?

निवघा बाजार येथील यशवंत नरवाडे हा आई रेखाबाई आणि आत्या अनुसयाबाई लोणारे यांना घेऊन दुचाकीवरून जात होता. हडसनी गावाजवळ येताच भरधाव वेगातील कार आणि दुसरी एक दुचाकीसोबत भीषण धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेजण दूरवर फेकल्या गेले. या धडकेत आई, मुलगा आणि आत्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवरील एकजण आणि कारमधील एकजण असे दोघे गंभीर जखमी झाले. जखमीवर नांदेडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nanded news
भयकंर! दोन भरधाव कारची समोरसमोर धडक; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

साताऱ्यात भीषण अपघात

साताऱ्यातील पाटखळ गावच्या हद्दीत भीषण अपघाताची घटना घडली. या गावात गुरुवारी पहाटे कालव्यामध्ये ट्रक पडला. ट्रकमधील चालक आणि क्लिनर सुरक्षित आहेत. कण्हेर आणि उरमोडी धरणातून पाणी विसर्ग बंद करण्यात आला होता. ट्रक कालव्या बाहेर क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला. त्यानतंर दोन्ही धरणातून विसर्ग पूर्ववत करण्यात आला आहे. कालव्याजवळील वाढत्या अपघातामुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com