Solapur News
Solapur NewsSaam Tv

Solapur : पत्नीच्या आजाराला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; सोलापूर येथील घटना

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Published on

Solpaur News : सोलापुरातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. पत्नी आजारी असल्याच्या टेन्शनमध्ये एका शेतकऱ्याने आपलं आयुष्य संपवलं. शेतातील लिंबाच्या झाडाला सुती दोरीच्या साह्याने गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केली. सोलापूर जिल्ह्यातील चिखर्डे गावात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Solapur News
Mumbai Crime : नोकरानेच केली मालकाची हत्या; धक्कादायक कारण उघडकीस

दिगंबर वाघमारे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. याबाबत मुलगा तुषार वाघमारे यांनी पांगरी पोलिसात (police) फिर्याद दिली आहे. दिगंबर वाघमारे हे शेतामध्ये कामानिमित्त गेले होते. त्यांची पत्नी साधना या पंधरा दिवसांपासून आजारी असून त्यांच्यावर बार्शीच्या (Barshi) खाजगी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत.

दरम्यान तुषार याचे मित्र निहाल मुलानी यांनी फोन करून तुझ्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, अशी माहिती दिली. तेव्हा तुषार याने शेतात जाऊन पाहिले असताना शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेतल्याचे दिसले. पत्नी आजाराचे टेन्शन घेऊन गळफास घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वाघमारे यांनी आजारी पत्नीच्या उपचारासाठी लोकांकडून उसने पैसे घेतलेले होते. याशिवाय शेतात नापिकी होती. त्यामुळे टेन्शन घेऊन शेतकऱ्याने आपलं आयुष्य संपवलं. मृत शेतकऱ्याचा मुलगा तुषार याने पोलिसांत दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Solapur News
Ahmadnagar Crime : शिंदे गटातील नेत्याचं हॉटेल फोडलं; भाजप नेत्याच्या मुलासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा

सोलपुरातील मांडेगावात तरुणाची आत्महत्या

एका तरुणाने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. समाधान मिरगणे अस आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत समाधानचे चुलत भाऊ पांडुरंग नामदेव मिरगणे यांनी बार्शी तालुका पोलिसात खबर दिली आहे.

समाधान मिरगणे हा घरातून बाहेर पडला. तो रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नाही.आई सुमनबाई यांनी सकाळी गावात मित्राकडे जाऊन चौकशी केली परंतु तो मिळून आला नाही.

अखेर येईल.. कुठेतरी गेला असेल म्हणून ती शेतात गेली. तेथे स्वतःच्या शेतातच विहिरीपासून अगदी ४० फूट अंतरावर नदीच्या कडेला बाभळीच्या झाडास दोरीने गळफास घेत लटकलेल्या स्थितीत समाधान निदर्शनास आला. तिने लागलीच पतीला याची माहिती दिली. समाधानने आत्महत्या कोणत्या कारणातून केली,याचा पोलीस तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com