Ahmadnagar Crime : शिंदे गटातील नेत्याचं हॉटेल फोडलं; भाजप नेत्याच्या मुलासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा

भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलामध्ये आणि शिंदे गटाच्या शहर जिल्हाध्यक्षामध्ये वाद झाला.
Shinde Group vs BJP Ahmadnagar Clash
Shinde Group vs BJP Ahmadnagar ClashSaam TV
Published On

Ahmadnagar News : राजकारणातील दोन जवळचे मित्र शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी अगदी काही महिन्यांपूर्वी राज्यात एकत्रित येऊन सत्ता स्थापन केली. मात्र, सत्तेनंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये काही ठिकाणी वादविवाद होत असल्याचे प्रकार समोर आले आहे. असाच काहीसा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातून समोर आला आहे. (Latest Marathi News)

अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलामध्ये आणि शिंदे गटाच्या शहर जिल्हाध्यक्षामध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेली की, कर्डिले यांच्या मुलाने शिंदे गटाच्या शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांच्या हॉटेलची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Shinde Group vs BJP Ahmadnagar Clash
Aditya Thackeray: 'नऊ महिने झाले, आता भाषण अपडेट करा', आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

नेमकं काय घडलं?

अहमदनगर (Ahmadnagar) शहरातील केडगाव परिसरात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धुमश्चक्री झाली. यामध्ये काही नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. याशिवाय काही वाहनांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे. ही घटना नगर पुणे रोडवरील केडगाव येथील रंगोली हॉटेल समोर घडली.

याप्रकरणी विठ्ठल नानाभाऊ सातपुते यांनी तोफखाना पोलीस (Police) स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली केली असून भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय शिवाजी कर्डिले यांच्यासह अज्ञात 50 ते 60 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, एका लग्न समारंभात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले आणि शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांचा ओंकार सातपुते यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला होता. या वादात कर्डिले यांच्या मुलाने कार्यकर्त्यांना घेऊन सातपुते यांच्या मालकीच्या रंगोली हॉटेवर तुफान दगडफेक केली.

Shinde Group vs BJP Ahmadnagar Clash
Maharashtra Politics : ठाकरे की शिंदे? शिवसेनेवर हक्क कुणाचा? राज्यातील सत्तासंघर्षावर आज 'सुप्रीम' सुनावणी

या दगडफेकीत काही हॉटेलसह परिसरातील काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याशिवाय हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या निष्पाप नागरिकांनाही दुखापती झाल्या. दगडफेकीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Maharashtra Political News)

याप्रकरणी दिलीप सातपुते यांचे बंधू विठ्ठल सातपुते यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा फिर्याद दाखल केली. तक्रार दाखल होताच, पोलिसांनी कर्डिले यांच्या मुलासह 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे करीत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com