Aditya Thackeray: 'नऊ महिने झाले, आता भाषण अपडेट करा', आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Aditya Thackeray: कॉमेडी किंवा जूनी भाषणे ऐकायची असेल तर मुख्यमंत्र्यांची भाषण ऐका, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला.
Aditya Thackeray:
Aditya Thackeray:saam tv

Aditya Thackeray: शिवसेनेचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. कॉमेडी भाषणे ऐकायची असेल तर मुख्यमंत्र्यांची जूनी भाषणे ऐका. त्यांच्या सभेला फक्त खचाखच खुर्च्या असतात. नऊ महिने झाले आता भाषण अपडेट करा, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज मुंबईतील बोरिवली पूर्व येथे जाहीर मेळावा होत आहे. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या दोन्ही प्रमुख नेत्यांनी या जाहीर मेळाव्याला मार्गदर्शन केले. बोरिवली पूर्वेकडील जय महाराष्ट्र नगर टाटा पावर हाऊस येथे हा मेळावा पार पडला. (Latest Marathi News)

Aditya Thackeray:
Mumbai: 'ईडीच्या भितीमुळेच एकनाथ शिंदे भाजपसोबत..' सुषमा अंधारेंचा हल्लाबोल; PM मोदींवरही केली टीका

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'शिवसेनेचा प्रतिनिधी येतोय म्हणून गावोगावचे लोक सभा ऐकण्यासाठी येतात. आपण शिवसेना म्हणून जे काही केले ते जनतेसाठी केले. त्यांनी जे केले ते सत्तेसाठी केले. हे गद्दार गँगचे सरकार आहे, हे सरकार महाराष्ट्रासाठी नसून दिल्लीसाठी आहे' अशा शब्दात त्यांनी शिंदे गट आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरेंच्या या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांनी 50 खोके एकदम ओके घोषणा दिल्या.

आदित्य ठाकरे म्हणाले, 'आज शेतकऱ्यांना माहित नाही कुणाकडे जायचे. कोणालाही फोन करा आणि विचारा महाविकास आघाडी सरकार आणि आत्ताचे सरकार यातील चांगलं सरकार कोणतं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना आपले कुटुंब प्रमुख म्हणून जवळचे वाटतात. ओल्या दुष्काळाचे पैसे सरकारने अजून दिले नाहीत'. आता शेतकरी मुलांना एमआयडीसी किंवा मुंबईकडे पाठवत आहे. शेती करायला कोणीही तयार नाहीत, असेही ते म्हणाले. (Maharashtra Political News)

Aditya Thackeray:
Pune: ठरलं तर! कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीत मनसेची भाजपला साथ; राज ठाकरेंचा आदेश

पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या आठ महिन्यात तरुणांना रोजगार देणारा एकही उद्योग महाराष्ट्रात आला नाही. आम्ही साडे सहा लाख कोटीची गुंतवणूक आणली. लाखो तरुणांना रोजगार मिळणार होते. या गद्दारांमुळे पाच ते सहा उद्योग परराज्यात गेले. आताच्या उद्योग मंत्र्याचे उद्योग महाराष्ट्र आणि त्यांच्या मतदार संघातील लोकांना माहिती आहेत,' असे आदित्य ठाकरे म्हणाले.

'वेदांता फॉक्सकॉन शंभर टक्के आपल्या राज्यात येणार होता. गद्दारांचे मुख्यमंत्री तो वेदांता आपल्याकडे येणार असे म्हणत होते, किती गुंतवणूक होती हे त्यांना माहिती सुद्धा नव्हते. उद्योग क्षेत्र गढूळ झाले आहे. उद्योग क्षेत्रातील कोणाचाही मुख्यमंत्र्यावर विश्वास नाही, अशा शब्दात आदित ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेवर हल्लाबोल केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com