Sushma Andhare: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज मुंबईतील बोरिवली पूर्व येथे जाहीर मेळावा पार पडला. बोरिवली पूर्वेकडील जय महाराष्ट्र नगर टाटा पावर हाऊस येथे हा मेळावा झाला. या मेळाव्यासाठी युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना उप नेत्या सुषमा अंधारे हजर होत्या.
यावेळी शिवसेना उपनेत्या सुषमा अंंधारे यांनी "या कार्यक्रमाला खुर्च्या कमी पडत आहेत आणि एकनाथ भाऊच्या (Eknath Shinde) सभेतील खुर्च्या मात्र उचलून जमा कराव्या लागतात," असे म्हणत शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार शाब्दिक हल्लाबोल सुरू आहे. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वरळीतून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते, ज्यानंतर हा वाद सुरू झाला होता. यावरुनच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे...
या सभेत बोलताना सुषमा अंधारे यांनी "३२ वर्षीय नेत्याने भल्या भल्यांची बत्तीशी गुल केली आहे. आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचा आवाज दाबू शकत नाही त्यामुळे शेळीने उंटाचा मुका घ्यायला जाऊ नये," अशी जहरी टीका शिंदे गटावर केली. त्याचबरोबर समृद्धी महामंडळात झालेला घोटाळा आणि इडीच्या भितीमुळेच ते भाजपात गेल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांच्यावरही सुषमा अंधारेंनी निशाणा साधला. "शंभुराजे शिवसेनेमुळे आमदार झाले आहेत. 2009 पर्यंत यांना गुलाल पण लागला नव्हता, असे म्हणत घमेंड तो पहाडो का भी तुटता है प्रकाश सुर्वे और शंभुराजे तो भी क्या चीज है," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तसेच तुम्हाला उभं करु शकतो तर आडवं ही करु शकतो असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला.
मोदींच्या मुंबई दौऱ्यावरही केली टीका...
यावेळी सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावरही निशाणा साधला. "कधीतरी गरिबांचे ही ऐका, तुमचीच मन की बात आम्ही का ऐकायची?" असे म्हणत "सारखं सारखं ये जा करण्यापेक्षा सरळ मुंबईत 2BHK घ्या," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.