Kalyan News: डोंगरावरून ३ दिवस माती वाहिली, घरी आल्यानंतर मृत्यू; १३ वर्षीय मुलाच्या गूढ मृत्यूनं खळबळ

हा मृत्यू नेमका कशाने झाला याचे गुढ अद्याप कायम आहे. उन्हाच्या तडाख्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
 Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam TV

अभिजीत देशमुख...

Mumbai: सातवीमध्ये एका १३ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे कल्याण पूर्व भागातील सूचकनाका परिसरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे शाळेमध्ये शिवजयंती निमित्त किल्ले बनविण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी शाळेच्या शिक्षकांकडून डोंगरावरुन माती आणायला सांगितली जात होती. 3 दिवसांपासून लहान मुले माती आणत होती.

त्यापैकी आफताब सय्यद हा मुलगा माती घेऊन घरी आला. आणि यानंतरच घरात त्याचा अचानक मृत्यू झाला. हा मृत्यू नेमका कशाने झाला याचे गुढ अद्याप कायम आहे. उन्हाच्या तडाख्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मात्र मुलाच्या मृत्यूचे कारण तपासानंतर उघड होणार आहे. याबाबत शाळा प्रशासनाची संपर्क साधला असता त्यांनी ही घटना दुर्दैवी असून पुढे काहीही बोलण्यास नकार दिला आहे. (Kalyan News)

 Kalyan Crime News
Pune: ठरलं तर! कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीत मनसेची भाजपला साथ; राज ठाकरेंचा आदेश

याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण पूर्व भागातील सूचकनाका येथील सिद्धार्थ विद्यामंदीर ही शाळा आाहे. या शाळेत शिवजंयती निमित्त किल्ले तयार करण्याचे काम सुरु आहे. शाळेच्या आवारात चार ते पाच मोठे किल्ले बनवण्यात आले आहेत. या किल्ल्याला लागणारी माती शाळेकडून विद्यार्थ्यांना आणायला सांगितली होती.

त्यामुळे विद्यार्थी शाळेच्या मागे असलेल्या डोंगरावरून ही माती आणत होते. याच शाळेत सातवीत शिकणारा आफताबही माती आणण्यासाठी जात होता. आज आफताब शाळेत गेला व तिथून माती आणण्यासाठी डोंगरावर गेला होता. डोंगरावरुन माती आणून घरी गेला व तेथेच त्याचा संशयास्पद रित्या मृत्यू झाला.

 Kalyan Crime News
Nana Patole: ही भाजपची खेळी; देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावर नाना पटोलेंना 'हा' संशय

त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे गुढ अद्याप कायम आहे. मात्र शिक्षकांनी त्याला माती आणण्यास सांगितले भर उन्हात त्यांनी माती आणली त्यामुळे त्याला उन्हाचा तडाखा बसला असावा असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणात जबाबदार शिक्षकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भारत सोनवणे यांनी केली आहे. या प्रकरनी कोळसेवाडी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News Update)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com