Mumbai Crime : नोकरानेच केली मालकाची हत्या; धक्कादायक कारण उघडकीस

आरोपी पळून जात असताना दादर रेल्वे स्थानकातून घेतलं ताब्यात
Mumbai Crime
Mumbai CrimeSaam Tv
Published On

संजय गडदे

Mumbai Crime News : मुंबईत मागील काही दिवसांपासून चोरी आणि खुणांच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व परिसरातील एका वृद्ध दांपत्यावर त्यांच्याच घरात काम करणाऱ्या केअरटेकरने धारदार शस्त्राने हल्ला केला.

या हल्ल्यात वृद्ध मालकाचा जागीच मृत्यू झाला. तर वृद्ध मालकीण गंभीर जखमी असून तिला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai Crime
Ahmadnagar Crime : शिंदे गटातील नेत्याचं हॉटेल फोडलं; भाजप नेत्याच्या मुलासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा

दरम्यान, मुंबई (Mumbai) सोडून परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला मेघवाडी पोलिसांनी (Police) दादर रेल्वे स्थानकातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पूर्वेकडील श्री स्वामी समर्थ इमारतीमधील चिपळूणकर कुटुंबीयांच्या घरातून भांडी जोरजोरात फेकली जात असल्याचा आवाज आला.

यानंतर शेजाऱ्यांनी बेल वाजवली असता त्या घरातील केअरटेकर पळून गेला. समोरील दृश्य पाहून शेजाऱ्यांच्याही अंगाचा थरकाप उडाला. केअरटेकरने केलेल्या हल्ल्यात त्या घरातील सुधीर चिपळूणकर (७५ वर्षे) या वृद्ध मालकाचा मृत्यू झाला होता आणि त्यांच्या पत्नी सुप्रिया चिपळूणकर (६९ वर्षे) या गंभीर जखमी झाल्या होत्या. या संदर्भातील फिर्याद मेघवाडी पोलिसांना मिळाली होती.

Mumbai Crime
Mumbai News : इमारतीच्या ४२ व्या मजल्यावरून दगड कोसळला, २ तरुणांचा मृत्यू; वरळीतील दुर्घटना

मेघवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित हत्या ही त्या घरातील केअर टेकरनेच केली असल्याचं निष्पन्न होतात तपासासाठी पोलीस पथक पाठवले केअरटेकर सिद्धेश्वर एक्सप्रेसने परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला दादर (Dadar) रेल्वे स्थानकातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता चोरीच्या उद्देशाने ही हत्या केल्याची कबुली जबाब आरोपीने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com