Solapur : गर्भवती महिलेसोबत घडला भयंकर प्रकार; एचआयव्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह दिल्यानं संसार उद्ध्वस्त

Solapur News : सोलापूरमध्ये खोट्या एचआयव्ही रिपोर्टमुळे गरोदर महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा आरोप होत असून या प्रकरणी प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Solapur : गर्भवती महिलेसोबत घडला भयंकर प्रकार; एचआयव्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह दिल्यानं संसार उद्ध्वस्त
Solapur NewsSaam Tv
Published On
Summary
  • खोट्या एचआयव्ही रिपोर्टमुळे महिला अडचणीत

  • कुटुंबात संशय आणि सामाजिक परिणाम

  • प्रशासनाने चौकशी समिती नेमली

  • आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

विश्ववभूषण लिमये,सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात खोट्या एचआयव्ही रिपोर्टमुळे एका महिलेचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या संतापजनक प्रकरणामुळे आरोग्य यंत्रणांतील कथित हलगर्जी आणि गैरव्यवहारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला सात महिन्यांची गरोदर असताना तिला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तिच्या पतीचे आणि पोटातील बाळाचे रिपोर्ट्स अनेक वेळा निगेटिव्ह आले. त्यानंतर महिलेने इतर ठिकाणी डॉक्टरांकडे तपासणी केली, मात्र सगळेच रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे समोर आले. या रिपोर्टमुळे पतीला आणि सासरच्या मंडळींमध्ये संशय अधिक गडद झाला. या प्रकारामुळे महिलेच्या कौटुंबिक आयुष्यावर गंभीर परिणाम झाला असून सासरच्या मंडळींनी तिला घरातून बाहेर काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Solapur : गर्भवती महिलेसोबत घडला भयंकर प्रकार; एचआयव्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह दिल्यानं संसार उद्ध्वस्त
Shocking : संतापजनक! ९वीच्या विद्यार्थिनीवर ४ महिने १० जणांनी केला बलात्कार

या प्रकरणात संबंधित आयसीटीसी केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चुकीचा अहवाल दिल्याचा आरोप होत असून, याबाबत चौकशीची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

Solapur : गर्भवती महिलेसोबत घडला भयंकर प्रकार; एचआयव्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह दिल्यानं संसार उद्ध्वस्त
Crime News : बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं, नंतर रचला आत्महत्येचा बनाव; १२ व्या दिवशी असा झाला भंडाफोड?

डॉ. वर्षा डोईफोडे यांनीही या घटनेची दखल घेत चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान या घटनेविरोधात कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकारामुळे आरोग्य तपासणी यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून संपूर्ण राज्यात या घटनेची चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com