BJP MLA : भाजप आमदाराला गोळ्या घाल, पैसे देतो; चालकाला २ जणांनी दिली ऑफर, महाराष्ट्रात खळबळ

BJP MLA Sachin Kalyanshetti : सोलापुरात अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालण्यासाठी त्यांच्या वाहन चालकाला पैशांचे आमिष दिल्याचा आरोप आहे. चालकाच्या तक्रारीनंतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
BJP MLA Sachin Kalyanshetti and Solapur police investigation
BJP MLA Sachin Kalyanshetti amid Solapur police probeSaam TV (AI image)
Published On

विश्वभूषण लिमये, सोलापूर प्रतिनिधी

BJP MLA Sachin Kalyanshetti killing plot in Solapur : तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो, अशी ऑफ असे म्हणत भाजप आमदारांच्या वाहन चालकांना ऑफर दिल्याची धक्कादायक घटना सोलापूरमधून समोर आली आहे. या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी २ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भाजप आमदाराला गोळ्या मारण्यासाठी ऑफर दिल्याची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी २ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

भाजप आमदाराला गोळ्या मार, असे आमिष चालकाला दिल्याप्रकरणी सोलापुरातील महावीर चौक परिसरात घडली आहे. या प्रकरणी आरोपी श्रीशैल हुळळी आणि त्याचा साथीदार फुलारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मारण्यासाठी त्यांच्या वाहन चालकाला पैशाचे आमिष दिल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. सचिन कल्याणशेट्टी हे भाजपचे अक्कलकोटचे विद्यामान आमदार आहेत.

BJP MLA Sachin Kalyanshetti and Solapur police investigation
शरद पवारांच्या खासदारांची मोदींकडे सर्वात मोठी मागणी, पंतप्रधानांचे आश्वासन, ३० मिनिटांच्या बैठकीत नेमकं काय झालं?

वाहन चालक आनंद सुरवसे यांच्या फिर्यादीवरून सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कुटुंबीय सोलापुरात खरेदीसाठी आले होते. त्यावेळी गाडीजवळ थांबलेले चालक आनंद सुरवसे यांच्याजवळ आरोपी श्रीशैल हुळळी आणि फुलारी हे दोघे आले. तुला आम्ही पैसे देतो तुझ्या आमदार दादाला गोळया घाल, पुढचं आम्ही बघून घेऊन यात तुझा फायदा आहे असे सांगत आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला.

BJP MLA Sachin Kalyanshetti and Solapur police investigation
राजकारणात खळबळ! मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला भाजप आमदाराची रसद? बड्या नेत्याचा गंभीर आरोप

वाहन चालक आनंद सुरवसे यांनी नकार देत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी तिथून पळ काढला. मात्र या घटनेनंतर वाहन चालक आनंद सुरवसे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ तपासाला सुरूवात केली आहे. या मागे नेमका कुणाचा हात आहे का? याचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com