Solapur : क्रिकेटच्या मैदानात भयंकर घडलं, रोलर ओढत असताना १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

Solapur News : बार्शीतील शिवशक्ती मैदानावरील क्रिकेट समर कॅम्पमध्ये जड रोलर अंगावरून गेल्याने १५ वर्षीय आरव ऊर्फ वीरेन योगीराज चौधरी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
BARSHI CRICKET CAMP TRAGEDY: 15-YEAR-OLD AARAV CHAUDHARY DIES AFTER PITCH ROLLER ACCIDENT
BARSHI CRICKET CAMP TRAGEDY: 15-YEAR-OLD AARAV CHAUDHARY DIES AFTER PITCH ROLLER ACCIDENTSaam Tv
Published On
Summary
  • सोलापुरातील बार्शीत क्रिकेट समर कॅम्पमध्ये १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

  • क्रिकेट पिचवरील जड रोलर ओढताना तोल गेल्याने रोलर त्याच्या अंगावरून गेला

  • उपचारापूर्वी डॉक्टरांनी मृत घोषित केले

  • सुरक्षेच्या उपाययोजनांवर आणि प्रशिक्षकांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह

विश्वभूषण लिमये, सोलापूर

Solapur Aarav Chaudhary Dies News बार्शी शहरातील शिवशक्ती मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट समर कॅम्पमध्ये शनिवारी सकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. क्रिकेट पिच तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा जड रोलर अंगावरून गेल्याने आरव ऊर्फ वीरेन योगीराज चौधरी (वय १५) या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे विद्यार्थ्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवशक्ती मैदानावर बार्शी (Shivshakti Playground Barshi Solapur) तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने क्रिकेट समर कॅम्पचे (Cricket Summer Camp) आयोजन करण्यात आले होते. आरवने या कॅम्पमध्ये प्रवेश घेतला होता. शनिवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे सरावासाठी मैदानावर गेला होता. कॅम्पमध्ये विवेक दुगम आणि अक्षय देबडवार हे प्रशिक्षक मुलांना प्रशिक्षण देत होते. मृत विद्यार्थ्याचे वडील योगीराज चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सकाळी सुमारे ७ ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांकडून क्रिकेट पिचवरील जड रोलर ओढून घेतला जात होता.

BARSHI CRICKET CAMP TRAGEDY: 15-YEAR-OLD AARAV CHAUDHARY DIES AFTER PITCH ROLLER ACCIDENT
Maharashtra Monsoon : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट, मराठवाड्यावर सर्वात मोठं सकंट; हवामान विभागाच्या अंदाजाने धाकधूक वाढली

हा रोलर हलवताना घटनास्थळी कोणताही तंत्रज्ञ, प्रशिक्षक किंवा जबाबदार व्यक्ती उपस्थित नव्हती. प्रशिक्षक काही अंतरावर उभे होते, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. रोलर ओढत असताना आरवचा अचानक तोल गेला आणि तो खाली पडला. त्याच वेळी जड रोलर त्याच्या पायापासून छातीपर्यंत अंगावरून गेल्याने गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. उपस्थितांनी तातडीने त्याला उपचारासाठी जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये (Jagdale Mama Hospital Solapur) दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

BARSHI CRICKET CAMP TRAGEDY: 15-YEAR-OLD AARAV CHAUDHARY DIES AFTER PITCH ROLLER ACCIDENT
Mumbai Rain Alert : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, 'या' शहरांना यलो अलर्ट जारी; वाचा हवामानाचा अंदाज

या घटनेमुळे क्रीडा प्रशिक्षण केंद्रांमधील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अल्पवयीन मुलांकडून जड यंत्रसामग्री हाताळून घेतल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे. बार्शी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com