पंढरपूरमध्ये भयंकर दुर्घटना; विहिरीचा कठडा कोसळून ४ जण ढिगाऱ्याखाली, तिघांचे मृतदेह बाहेर काढले

Pandharpur Ambe Village Well Accident : पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहिरीचा कठडा कोसळून चार मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. वीस तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या बचावकार्यात तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून चौथ्या मजुराचा शोध सुरू आहे.
Pandharpur Well Accident News
Pandharpur Well Accident News
Published On: 

Pandharpur Well Accident News : पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील विहीर दुर्घटनेतील बचाव कार्य वीस तासानंतरही सुरूच आहे. दरम्यान, रात्री दोन वाजता तीन मृतदेह सापडले असून, एकाचा शोध अद्याप सुरू आहे. काल सकाळी दहा वाजता आंबे येथील एका विहिरीचा कठडा कोसळून चार मजूर गाडले गेले होते. काल दिवसभर शोध मोहीम सुरूच होती. सायंकाळी एनडीआरएफची (NDRF) टीम दाखल झाल्यानंतर शोधकार्य जोमाने सुरू झाले.

यादरम्यान रात्री दोन वाजेपर्यंत मंगेश मोरे आणि सिद्धेश्वर घाडगे यांच्यासह तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. या घटनेनंतर रात्री सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा केली आणि त्यांना धीर दिला. तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन हे कालपासून घटनास्थळी ठाण मांडून आहेत.

Pandharpur Well Accident News
Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

दुर्घटनेची चौकशी केली जाईल

"ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र, या विहिरीच्या कामात नेमकी कोणती पद्धत वापरली गेली, परवानगी घेतली होती का, ब्लास्टिंग (स्फोटक) करण्यात आले होते का आणि कामगारांच्या सुरक्षेचे काय उपाय योजले होते, या सर्व बाबींची सखोल चौकशी केली जाईल," अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. या अपघाताची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Pandharpur Well Accident News
Accident : लग्नाहून येताना भीषण अपघात! SUV आणि पिकअपची जोरात धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू, ९ गंभीर

मृतांचा शोध घेण्याचे काम सुरू

विहीर दुर्घटनेतील चार मजुरांपैकी तिघांचे मृतदेह सापडले असून, एकाचा शोध अद्याप सुरू आहे. विहिरीत अडकलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आणि उर्वरित शोध घेण्यासाठी आमचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनी विहीर खोदाई करताना शासनाच्या सर्व परवानग्या घेऊनच काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.