Accident : लग्नाहून येताना भीषण अपघात! SUV आणि पिकअपची जोरात धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू, ९ गंभीर

Punjab Road Accident : पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यात लग्नाहून परतताना एसयूव्ही आणि पिकअप व्हॅनची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात तीन लहान मुलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
Punjab Road Accident
Punjab Road Accident
Published On: 

Five killed in SUV pickup collision in Punjab : पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यात लग्नाहून घराकडे येणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. एसयूवी (SUV) आणि पिकअप व्हॅनची समोरासमोर झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये ३ लहान मुलांचा समावेश आहे. अपघातात ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Fazilka Road Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मृत हे फाजिल्का येथील कर्णी खेरी गावचे रहिवासी होते . ते जलालाबादमधील तिवाना कलान गावात एका लग्नाला गेले होते. लग्नाहून घराकडे परत येत असताना थेह कलंदर गावाजवळ काळाने घाला घातला. त्यांच्या एसयूव्हीची समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅनशी धडक झाली.

Punjab Road Accident
सोसायट्यांच्या लिफ्टसाठी कडक नियम! सर्व्हिसिंग, थर्ड-पार्टी इन्शुरन्सचे नवे आदेश, पाहा A टू Z माहिती

या भीषण अपघातात तीन लहान मुलांसह ५ जणांचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या ९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक रहिवासी आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना जवळच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय.

Punjab Road Accident
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचं नाव बदलणार, मंत्री आदिती तटकरेंनी दिली मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाल्या?

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर पंचनामा करत गुन्हा दाखल केला. अपघाताची माहिती समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. अपघात इतका भीषण होता की गाड्याचा चक्काचूर झाला होता. फाजिल्काचे पोलीस अधीक्षक सत्येंद्र सिंह यांनी या भीषण अपघाताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, भीषण अपघाताची माहिती मिळताच फाजिल्काचे आमदार नरेंद्र पाल सिंह सावना यांनीही रूग्णालयात जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.