Plastic Rice : तुम्ही खाताय प्लास्टिकचा तांदूळ? काँग्रेस खासदारांच्या दाव्याने खळबळ, तथ्य काय? पाहा व्हिडिओ

Praniti shinde News : नफा कमवण्यासाठी खासगी दुकानदारांकडून भेसळीचे प्रकार घडल्याचं तुम्ही पाहिलं असेल. मात्र आता थेट रेशनच्या दुकानातूनच प्लॅस्टिकचे तांदूळ वितरीत केले जात असल्याचा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदेंनी केलाय. मात्र हा तांदुळ खरंच प्लॅस्टिकचा आहे का? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट
तुम्ही खाताय प्लास्टिकचा तांदूळ? काँग्रेस खासदारांच्या दाव्याने खळबळ, तथ्य काय? पाहा व्हिडिओ
Praniti shinde News Saam tv
Published On

भरत मोहोळकर, साम टीव्ही

सोलापूर : खाद्यपदार्थात भेसळीच्या घटना राज्याला नवीन नाहीत. याआधीही भेसळीच्या अनेक घटना समोर आल्यात. मात्र आम्ही तुम्हाला थेट रेशन दुकानातल्या धान्यातली भेसळ दाखवणार आहोत. ही भेसळ तुमची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही.

राज्यातल्या रेशन दुकानावर ग्राहकांना थेट प्लास्टिकचा तांदूळ देण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमध्ये ही घटना घडलीय. अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी गावाच्या रेशन दुकानात प्लास्टिकचे तांदूळ वितरीत केले जात असल्याचा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदेंनी केलाय. त्यांनी थेट पत्रकार परिषदेतच याचे पुरावे सर्वांसमोर दाखवले.

तुम्ही खाताय प्लास्टिकचा तांदूळ? काँग्रेस खासदारांच्या दाव्याने खळबळ, तथ्य काय? पाहा व्हिडिओ
Solapur Airport: सोलापूर विमानतळ लवकरच सुरू होणार; पीएम मोदी आज करणार उद्घाटन

प्रणिती शिंदेंचा आरोप सोलापूरच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी फेटाळून लावलाय... तर रेशनच्या दुकानातून वितरित करण्यात येणारे तांदूळ प्लास्टिकचे नसून फोर्टिफाईड तांदूळ असल्याचं स्पष्टीकरण दिलंय...

फोर्टिफाईड तांदूळ बनवतात कसा?

फोर्टिफाईड तांदळात लोह, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन बी 12 हे कृत्रिमरित्या मिसळतात. त्यासाठी तांदळाची भुकटी करून पोषक तत्वं मिसळून त्याला तांदळाचा आकार दिला जातो. फोर्टिफाईड तांदूळ 100 किलोत 1 किलो मिसळून वितरित केला जातो.

तुम्ही खाताय प्लास्टिकचा तांदूळ? काँग्रेस खासदारांच्या दाव्याने खळबळ, तथ्य काय? पाहा व्हिडिओ
Solapur News : सोलापुरातील शेतकऱ्याचा अनोखी शक्कल; १० वर्षांपासून कढीपत्त्याची शेती, वर्षाकाठी 'इतक्या' लाखांची कमाई

कुपोषणावर मात करण्यासाठी सरकारकडून फोर्टिफाईड तांदूळ वितरित केला जातो. मात्र हा तांदुळ प्लॅस्टिकसारखा दिसत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे सरकारने यासंदर्भात जनजागृती करायला हवी. मात्र फोर्टिफाईड तांदळाच्या नावाने तांदळात प्लॅस्टिकचा तांदूळ मिसळला जाणार नाही? याचीही खबरदारी घ्यायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com