दिवाळीत सोलापूरकरांना खूशखबर, १८ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस सुरू; तिकीट फक्त 10 रुपये

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सोलापूरकरांसाठी १८ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. या बसचे किमान तिकीट फक्त १० रुपये आहे.
Electric Bus
Electric BusSaam tv
Published On: 

दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोलापूर शहरातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सोलापूरकरांच्या सेवेत तब्बल 18 नवीन वातानुकूलित (AC) इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या अद्ययावत बससेवेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी महापौरांसह उपमहापौर आणि विविध लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी स्वतः तिकीट काढून या इलेक्ट्रिक बसमधून प्रवास करत सेवेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

कमी खर्चात वातानुकूलित प्रवास

सोलापूर महापालिकेने प्रवाशांच्या सोयीसाठी या वातानुकूलित बस प्रवासाचे किमान तिकीट अवघे १० रुपये ठेवले आहे. ही बससेवा दररोज सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत दोन वेगवेगळ्या सत्रांमध्ये नियमितपणे सुरू राहणार आहे.

Electric Bus
PM Mudra Yojana : बिनव्याजी २० लाखांपर्यंतच्या कर्जाची गॅरंटी, मोदी सरकारनं केली योजनेबाबत मोठी घोषणा

१६ महत्त्वाच्या मार्गांवर धावणार बसेस

केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री इलेक्ट्रिक बस सेवा' योजनेअंतर्गत सोलापूर शहरासाठी एकूण १०० इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात मिळालेल्या २० बसेसपैकी १८ बसेस प्रत्यक्ष प्रवाशांच्या सेवेत रुजू करण्यात आल्या आहेत, तर २ बसेस राखीव (रिजर्व्ह) ठेवण्यात आल्या आहेत. या बसेस शहरातील ९ मुख्य मार्ग आणि ग्रामीण भागातील ७ मार्ग अशा एकूण १६ वेगवेगळ्या मार्गांवर धावणार असून, यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील वाहतूक अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.