Solapur Anjangaon: अंजनगावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद अखेर मिटला; बैठकीत काय ठरलं?

Solapur Anjangaon Shivaji Maharaj Statue: माढा तालुक्यातील अंजनगाव येथे खेलोबा मंदिराच्या आवारात अचानक पुतळा बसवण्यावरुन वाद निर्माण झाला होता
Solapur Anjangaon Shivaji Maharaj Statue
Solapur Anjangaon Shivaji Maharaj Statue
Published On

सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यवरू सुरू असलेला वाद आज अखेर मिटला. खेलोबा येथे शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक आणून बसवल्याने वाद निर्माण झाला होता, अखेर तोडगा निघाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ज्या जागेवर बसवण्यात आला होता ही जागा खेलोबा देवस्थानची आहे, याबाबत दोन्ही समाजाचे एकमत झाले आहे.

त्यामुळे आता या पुतळ्याचे स्थलांतर केले जाणार आहे. यासाठी दोन्ही समाजाचे प्रतिनिधी मिळून नवी जागा शोधणार आहेत. आज वरिष्ठ अधिकारी योग्य जागेची पाहाणी करून पुतळा स्थलांतरित करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून गेल्या काही दिवसांपासून अंजनगावात जातीय तेढ निर्माण झाली होती. राज्य स्तरावर या मुद्द्याची चर्चा झाली होती. त्यामुळे प्रशासन आणि स्थानिक राजकारण्यांकडून या मुद्द्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

त्यासाठी शुक्रवारी रात्री पालकमंत्री जयकुमार गोरे , कोल्हापूर परिक्षेत्राचे आय जी सुनील फुलारे, नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि मराठा समाज प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत यशस्वी तोडगा निघाला.

शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवलेली जागा देवस्थानाची आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि मराठा समाज जी जागा पसंत करेल तिथे पुतळ्याचे स्थलांतर केले जाईल, असे ठरले आहे. त्यादृष्टीने आता आज जागेचा शोध घेतला जाईल. अंजनगावात स्थलांतरित जागेवर पुतळा उभारणीच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री जयकुमार गोरे लगेच मंजूर केला.

जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक ग्रामस्थांसोबत गावात फिरुन जागा निश्चित करतील. खेलोबा मंदिराच्या आवारात अचानक पुतळा आणून बसवल्याने वाद निर्माण झाला होता. त्यासाठी जनगावातील मंदिराचे पुजारी फरांडे महाराज यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. तीन दिवसांपासून त्यांनी अन्न त्याग केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com