Social Media तून औरंगजेब उदात्तीकरण, स्थानिकांची पाेलिसांत धाव; साेलापूरात युवकावर गुन्हा दाखल

Solapur Aurangzeb Photo Status: काेल्हापूरातील घटनेनंतर राज्यातील पाेलिस समाज माध्यमांवरील चुकीच्या गाेष्टींवर नजर ठेवू लागले आहेत.
Solapur Crime News,  aurangzeb photo status case
Solapur Crime News, aurangzeb photo status casesaam tv
Published On: 

Solapur News : औरंगजेबचे स्टेटस सोशल मीडियावर (social media) ठेवल्याने साेलापूर जिल्ह्यातील (solapur crime news) एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात औरंगजेब ( aurangzeb) आणि टिपू सुलतान (tipu sultan) यांचा समाज माध्यमातून प्रचार सुरु असल्याचा दावा हिंदुत्त्ववादी संघटना (hindu organisations) करु लागल्या आहेत. त्यातून बहुतांश ठिकाणी वादावादी हाेत आहे. (Maharashtra News)

Solapur Crime News,  aurangzeb photo status case
Navi Mumbai News : पार्टी ऐन रंगत असतानाच सातव्या मजल्यावरुन आला युवतीच्या किंकाळ्यांचा आवाज, युवक पाेलिसांच्या ताब्यात

"जल जल कर मर जाओगे, फिर भी तुम कुछ उखाड नही पाओगे" असा हिंदी भाषेत मजकूर लिहून साेलापूरात एका युवकाने औरंगजेबचा फोटो (Aurangzeb Photo Status) समाज माध्यमात स्टेटस ठेवला. औरंगजेबचे स्टेटस ठेवल्याने हिंदू धर्मियांचे भावना दुखावल्याचा स्थानिकांनी युवकावर आरोप करीत पाेलिसांत धाव घेतली.

Solapur Crime News,  aurangzeb photo status case
Pandharpur News : भाविकांनाे ! आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाई मंदिरात 'ही' दर्शन सेवा राहणार बंद

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शोएब मंगरूळकर असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना सोलापूरातील नवीन विडी घरकुल भागात घडली. या घटनेनंतर तक्रारदार पाेलिस ठाण्यात आले. त्यांच्या तक्रारीनूसार शोएब मंगळूरकर याच्यावर (कलम 153अ, 153 (ब), 295अ, 505 (2) प्रमाणे ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Solapur Crime News,  aurangzeb photo status case
Satara Collector Transfer: सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीमागे राजकारण ? साेमवारी महामाेर्चा

पाेलिस काेठडीत रवानगी

त्याला न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्यास 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती अनिल सनगल्ले (सहाय्यक पोलीस निरीक्षक, वळसंग पोलीस) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com